अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील झिरपी येथील आकाश (गोविंद) कल्याण फोके (वय-17) वर्ष हा युवक नदीत आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील झिरपी येथील आकाश (गोविंद) फोके हा सतरा वर्षीय युवक हा आपल्या एकलहेरा येथील आई आजी प्रयागाबाई खराबे यांच्या सोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारीत घुंगरडे हादगाव येथील विष्णु महाराज यांच्या दिंडीत आळंदी पासुन पायी दिंडीत सहभागी झाले होते..अकलुज परिसरातील निरा नदीच्या पात्रात मंगळवारी (ता.1) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेला असता तो पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी जावून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना याबाबत मदतीसाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला..घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ अकलोजकडे रवाना: झिरपी गावातील युवक आकाश फोके हा युवक पायी दिंडीत पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जात असताना अकलुज परिसरातील सराटी येथील नीरा नदीत आंगोळ करताना वाहून गेल्याची वार्ता कळताच झिरपी येथील आकाश फोके यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ यांनी सरळ घटनास्थळी अकलोज गाठले.झिरपीसह परिसरात पसरली शोककळा: झिरपी गावातील युवक हा नीरा नदीत आंघोळ करताना वाहून गेला.या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..प्रतिक्रीया -स्थानिकच्या ग्रामस्थांचे मदत कार्य सूरूअकलोज परिसरातील सराटी गावातील नीरा नदीत मंगळवारी सकाळी सहा वाजता आकाश (गोविंद) हा आंघोळ करताना पाय घसरून नदीच्या पात्रात वाहून गेला. ग्रामस्थ सकाळ पासून मदतीसाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु पंढरपूर येथून दुपारी साडे तीन वाजे पर्यंत एन. डी. आर. एफ. चे पथक घटनास्थळी न पोहचल्याने शोध कार्याला उशिरा लागत असल्याने फोके कुटुंब चिंताग्रस्त आहे.- डॉ. दिलीप फोके, झिरपी, ता. अंबड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.