Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्नाची संपूर्ण तयारी झाली, हळद लावायची आणि बोहल्यावर चढायचे. सर्व काही ठरले. मात्र ते नियतीला मान्य नसल्याने काळाने झडप घातली.
Waluj Nagar Accident
Waluj Nagar AccidentSakal

वाळूजमहानगर - दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्नाची संपूर्ण तयारी झाली, हळद लावायची आणि बोहल्यावर चढायचे. सर्व काही ठरले. मात्र ते नियतीला मान्य नसल्याने काळाने झडप घातली. आणि 34 वर्षीय नवरदेव तरुणाचा हळद लावण्यापूर्वीच अपघात होऊन जागीच ठार झाला. ही अत्यंत खळबळ जनक घटना रविवारी (ता.28) रोजी दुपारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज जवळील दिघी (येसगाव), ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील नेमिनाथ कैलास चव्हाण वय 34 या तरुणाचे गुरुवारी (ता.2) मे रोजी लग्न ठरले होते. लग्नाची सर्व तयारी झाली. मंगळवारी (ता.30) रोजी त्याला हळद लागणार होती. मात्र दुचाकीचे किरकोळ काम करावयाचे होते.

पाहुण्यांना आणण्यानेण्यासाठी तसेच इतर कामासाठी दुचाकी हाताशी असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून नेमीनाथ चव्हाण हा रविवारी (ता.28) रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी गेला होता. दुचाकी दुरुस्त केल्यानंतर तो दिघी येथे दुचाकी (एमएच 17, ए एच -641) वरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे तो दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला.

सिडको वाळूज महानगर -1 येथील ग्रोथ सेंटर जवळ दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात नेमीनाथ चव्हाण हा गंभीर जखमी झाला. काही दक्ष प्रवाशांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम बजाजनगर येथील दाखल केले. व नंतर काकासाहेब बाबासाहेब पवार, विनोद कैलास साध्ये, ज्ञानेश्वर बाबासाहेब पवार यांनी त्याला घाटीत दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश तारव करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com