जातपंचायतीच्या दंडावरून उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणाचा खून; आईने केली तक्रार, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

जातपंचायतीने ठोठावलेला दोन लाखांचा दंड वसुलीवरून सुनील काळे याचा खून केल्याची तक्रार त्याची आई तोळाबाई श्रीमंत काळे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद : जातपंचायतीने ठोठावलेला दोन लाखांचा दंड वसुलीवरून सुनील काळे याचा खून केल्याची तक्रार त्याची आई तोळाबाई श्रीमंत काळे यांनी दिली आहे. त्यानुसार येरमाळा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जातपंचायतीने ठोठावलेला दोन लाखांचा दंड देत नसल्याच्या कारणावरून बालाजी विश्राम पवार, आकाश सुरेश शिंदे, संजय सुरेश शिंदे (सर्व रा. येरमाळा) यांनी २७ डिसेंबरला सुनील श्रीमंत काळे (वय ३५) याचे अपहरण करून त्यास बालाजी पवार याच्या घरात डांबून ठेवले.

 

 

दंडाची रक्कम आम्हाला द्या आणि तुमच्या मुलाला परत घेऊन जा. अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी या लोकांनी मला व सुनीलच्या पतीला दिली, असे तोळाबाईंनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सुनील काळेचा मृतदेह येरमाळा शिवारातील ज्ञानोद्योग विद्यालयाजवळील एका शेतातील झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत बुधवारी (ता.३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास आढळला. जातपंचायतीच्या दंडाच्या वसुलीपोटी तिघांनीच सुनील यास ठार मारले आहे, अशी तक्रार तोळाबाईंनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम ३०२, ३४२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Killed Over Jat Panchayat Fine Yermala Osmanabad News