परळीकर युवकाचा दक्षिण-मध्य रेल्वेस्थानकावर घुमला आवाज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण आदोडे

परळीकर युवकाचा दक्षिण-मध्य रेल्वेस्थानकावर घुमला आवाज!

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहरातील (Parli Vaijanath) एक अवलिया युवकाचा आवाज दक्षिण-मध्य रेल्वेच्या स्थानकावर (South-Central Railway Station) महिलांच्या आवाजात घुमत आहे. या आवाजामुळे परळीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा युवक महिलांच्या आवाजात आवाज काढू शकतो. शहरातील भिमवाडी परिसरातील रहिवाशी श्रावण आदोडे यांचे शालेय शिक्षण गावभागातील वैद्यनाथ विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण येथील वैद्यनाथ (Beed) महाविद्यालयात सध्या सुरू आहे. श्रावणला लहानपणापासून रेल्वेचे जास्त आकर्षक असल्याने वेळ मिळेल तसे तो रेल्वेस्थानकावर जाऊन रेल्वे येण्याची उद्घोषणा ऐकत असे. घरी गेल्या नंतर तसाच आवाज काढण्याचा प्रयत्न करत असे. पुढे त्याला हुबेहूब आवाज येऊ लागल्यानंतर त्याने महिलांच्या आवाजात आवाज काढणे सुरू केले. तोपण त्याला व्यवस्थितपणे जमू लागले. या आवाजाबद्दल फारच आकर्षण निर्माण झाले. यातून त्याला वाटत होते की, आपण रेल्वेमध्ये नोकरी करावी. एके दिवशी त्याच्या ओळखीतील नातेवाईकांनी आवाज ऐकला व त्यांनी थेट नांदेड येथील रेल्वेस्थानकावर घेऊन गेले व तेथील स्थानकावर माईकमध्ये रेल्वेगाडी येण्याची उद्घोषणा करायला लावली. (youth of beed district worked as announcer at south central railway station glp 88)

स्थानकावरील प्रमुख काम सोडून तिथे आले व उद्घोषणा (अलांऊसिंग) कशी काय बदलली अचानक कारण आवाजात थोडासाबदल झाला होता. त्यांना सांगितले हा युवक तो आवाज काढत आहे. त्यांनाही विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा उद्घोषणा करायला लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. व श्रावणचे स्वप्न काही अंशी साकार झाले. कारण दक्षिण-मध्य रेल्वेचे सर्व स्थानकावरील उद्घोषणेचे काम (काॅन्ट्रॅक्ट) त्याला मिळाले होते. २०१९ ते २०२१ पर्यंत दक्षिण-मध्य रेल्वेच्या स्थानकावर श्रावणचाच आवाज घुमू लागला. पुढे श्रावणने हे काम सोडले. कारण त्याचे स्वप्न आहे. रेल्वेत अधिकारी व्हायचे आहे. अभ्यास करत असल्याने ते काम बंद केले आहे. पण रविवारी (ता.१८) येथील स्थानकावर अधिकाऱ्यांसमोर पुन्हा त्याने आवाज काढल्याने सोशलमीडियावर चांगलाच तो व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Beed