सुट्टीत सणासाठी युवक घरी परतला अन् असे घडले... 

jai jadhav
jai jadhav
Updated on

शिरड शहापूर ः औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे एका युवकाला हिटरचा शॉक लागून त्‍याचा मृत्‍यू झाल्याची घटना सोमवारी (ता.नऊ) सकाळी घडली. हा युवक सध्या राजस्थानमध्ये कोटा येथे शिक्षण घेत होता, सुट्टी असल्याने तो सणासाठी घरी परतला अन् त्याच्यावर काळाने झडप घातली.
 
शिरडशहापूर येथील अकरावी वर्गात शिकणारा जय ज्योती जाधव (वय १६) सकाळी सात वाजता अंघोळीसाठी गरम पाणी घेत असताना त्‍याला इलेक्‍ट्रीक हिटरचा शॉक लागला. घरच्यांनी त्‍याला उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले.वक
 
‘आयएआय’ अधिकारी होण्याचे होते स्वप्न 
जय हा शिक्षणात अत्यंत हुशार होता. पाचवी ते दहावीपर्यंत तो भावना पब्लिक स्कूल रिसोड येथे शिकत होता. त्यानंतर तो पुढील शिक्षण राजस्थानमध्ये कोटा येथे घेत होता. त्याचे स्वप्न ‘आयएआय’ अधिकारी बनण्याचे होते. तो सुट्ट्या असल्यामुळे घरी आला होता. तसेच तो घरच्यांना एकुलता एक होता, ऐन होळीच्या दिवशी युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पंचनामा जमादार प्रकाश नेव्हल यांनी केला व शवविच्छेदन वसमत उपजिल्हा रुग्णालय केले. या बाबत कुरुंदा पोलिस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. त्‍याच्या पार्थिवावर शिरडशहापूर येथे अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.

जुगारावर पोलिसांचा छापा
हिंगोली ः पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्‍ह्यात जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत जुगार कायद्यांतर्गत रविवारी (ता. आठ) कळमनुरी व गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत जुगारावर छापा टाकून आरोपीकडून जुगाराचे साहित्य व दोन हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळूचे टिप्पर पकडले
हिंगोली ः वसमत तालुक्‍यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा बाजार येथे बेकायदेशीर अवैध वाळूचे टिप्पर (एमएच २५ - एडी ११४७) हे अंदाजे अडीच ब्रास वाळू (किंमत १२ हजार ५०० रुपये) अवैधरीत्‍या घेऊन जात असताना मुद्देमालासह मिळून आल्याने टिप्पर जप्त करून कार्यवाही करण्यात आली आहे.

सोन्या-चांदीच्या दागिन्याची चोरी
हिंगोली ः औंढा नागनाथ तालुक्‍यातील काकडदाभा येथील सुभाष सावळे यांच्या घरी अज्ञाताने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व नगदी, असे एकूण ६२ हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी औंढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

महिलेची गळफास घेऊन आत्‍महत्या
हिंगोली ः सेनगाव तालुक्‍यातील जयपूर येथील एका महिलने रविवारी (ता. आठ) दुपारी राहत्या घरी साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्‍यातील जयपूर येथील उमा अंकुश लांभाडे (वय २५) हिने कोणत्यातरी कारणाने रविवारी दुपारी स्‍वतःच्या राहत्या घरी साडीने पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्‍महत्या केली. या बाबत पोलिस पाटील अमरदास पारीसकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com