

Mandgaon Youth Step In to Save Severely Injured Monkey After Clash
esakal
-सुनिल पांढरे
पळशी : ता. (बातमीदार) : मांडगाव (ता. सिल्लोड) : येथे माकडांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या एका माकडाला स्थानिक तरुणांनी तत्परतेने प्रथमोपचार करून अखेर वनविभागाच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी (ता. 23) रात्री घडली. या घटनेमुळे गावातील तरुणांची संवेदनशीलता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.