रक्तदानासाठी झरीकर सरसावले 

file photo
file photo

झरी (जि. परभणी) : देशावर ‘कोरोना’चे संकट असताना मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या आवाहनास झरी (ता. जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबिर घेऊन १०१ जणांनी रक्तदान केले आहे.
सध्या सर्वत्र ‘कोरोना’चे भीषण संकट उभे राहिले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमुळे रक्तदान शिबिरदेखील बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाकडून रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून झरी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत सोमवारी (ता. ३०) रक्तदान शिबिर घेतले. यात युवकांनी रक्तदानात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या रक्तदानासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान
 रक्तदान शिबिर  जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. अत्यंत शांततेत तसेच कुठलीही गर्दी न होऊ देता परिसरातील दोन दिवसांपासून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास विशेष करून १८ ते ३० मधील युवक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आयोजकांकडून दूरध्वनीद्वारे कॉल आल्यानंतरच रक्तदात्यांनी दहा मिनिटांत त्या ठिकाणी जायचे नियोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सदरील रक्तदान घेण्यात आले.


गर्दी टाळण्यासाठी शिबिर तात्पुरते स्थगित 
 अखेर १०१ रक्तदात्यांनी रक्तदान दिल्यानंतर एकदाच होणारी गर्दी टाळण्यासाठी व दात्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिबिर तात्पुरते स्थगित करून पुढील आठ दिवसांत घेण्याचे जाहीर केले. पुढील शिबिरासाठी १०० लोकांनी तयारी दर्शविली आहे. शिबिर यशस्वितेसाठी माजी सरपंच गजानन देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. प्रमोद देशमुख, महेश मठपती, अनिल देशमुख, ओंकार सावंत, अभिजित परिहार, दत्तप्रसाद आग्रवाल, योगेश शिरडकर, बाबासाहेब चौधरी, किशोर देशमुख, अंकुश शिंदे, सुदामराव सोनवने आदींनी पुढाकार घेतला.
 

रक्तदानासाठी दोन हजार युवक तयार
परभणी विधानसभेमध्ये दोन हजार युवकांची यादी तयार असून महाराष्ट्रात कुठेही रक्त कमी पडल्यास हे युवक रक्तदान देण्यासाठी तयार आहेत.
- डॉ. आमदार राहुल पाटील, परभणी विधानसभा मतदारसंघ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com