vaijapur panchyat samiti election reservation draw
sakal
वैजापूर - जिल्हा परिषदच्या ८ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी सोमवारी आरक्षण निश्चित झाले. पंचायत समितीच्या ८ व जिल्हा परिषदेच्या ४ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग चार तर उर्वरित ९ जागा सर्वसाधारण ( खुल्या ) राहिल्या आहेत. राखीव झालेल्या गणामुळे इच्छुकांचे स्वप्न अधुरे राहणार आहे.