
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत आज ( बुधवार, दि. १८ जून रोजी) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व सातारा वॉरियर्स संघात सामना होणार आहे.
सोमवारी पावसामुळे तीनही सामने रद्द करावे लागले होते व सर्व संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. सातारा वॉरियर्स संघासाठी प्लेऑफ मध्ये प्रवेशाच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.