MPL 2025 : ईगल नाशिक टायटन्स विजेते; महाराष्ट्र प्रीमियर लीग, रायगड उपविजेतेपदाचा मानकरी
Eagle Nashik Titans : ईगल नाशिक टायटन्स संघाने शानदार विजय मिळवत महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले. अर्शिन कुलकर्णीच्या आक्रमक ७७ धावांच्या खेळीने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
पुणे : ईगल नाशिक टायटन्स संघाने महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अटीतटीच्या लढतीत त्यांनी रायगड रॉयल्स संघावर सहा विकेट राखून मात केली.