
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सांगता शानदार सोहळ्याने संपन्न झाली. या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भव्य लाइट शो, हेलियम बलून शो आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेत्रदीपक सोहळा रंगला.