
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत यश नाहर(५९धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह सचिन भोसले(४-३८) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार ५ गडी राखून विजय मिळवत आपली आगेकुच कायम राखली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धीरज फटांगरे(०) खाते न उघडताच तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने त्याला झेल बाद केले व संघाला पहिला धक्का दिला.