
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.
शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वातील कोल्हापूर टस्कर्सने २ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. त्रिपाठी विजयाचा हिरोही ठरला. त्याने फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही मोलाचे योगदान दिले.