
अमोल शिंदे
क्रिकेट या खेळाची ओळख आज केवळ पारंपरिक क्रिकेट खेळणाऱ्या देशांनाच नव्हे, तर एमएलसीसारख्या स्पर्धेमुळे अमेरिका व जगभरातील प्रेक्षकांना आहे, परंतु भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात दर्जेदार क्रिकेटपटू घडवणे ही एक मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान ठेवून, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे २०२३ पासून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा आज राज्याच्या प्रत्येक भागातील क्रिकेटपटूंना नवी दिशा देणारा आणि संधीचा सोनेरी दरवाजा उघडणारा उपक्रम ठरतो आहे.