MPL Final 2025 : महाराष्ट्र प्रीमियर लीगची आज सांगता; दिमाखदार सोहळा, त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार
Eagle Nashik Titans vs Puneri Bappa : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचे अंतिम सामना रविवारी रंगणार असून समारोप सोहळ्यात भव्य लाइट शो आणि आतषबाजी होणार आहे. नाशिक टायटन्स व पुणे वॉरियर्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचे तिसरे पर्व अंतिम टप्प्यात आले असून या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (ता. २२) सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रंगणार आहे.