MPL 2025: Maharashtra Premier League Begins June 4 in Pune, Live on Star Sports and JioCinema – Free Entry for Fans : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर येत्या ४ जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल) या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील एमपीएलचा ४ एस पुणेरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलचा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच एमपीएलमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील सर्वसामान्य कुटुंबातील नवोदित गुणवान खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत असल्याचेही त्यांच्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.