महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेत सिद्धेश वीर (नाबाद १०४ धावा) याने केलेल्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाचा डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.