Maharashtra Premier League, 2025
Maharashtra Premier League, 2025 esakal

MPL 2025 : धीरज फटांगरेची फिफ्टी, आझीम काझीच्या फटकेबाजीने रत्नागिरी जेट्सला मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचवले, नाशिक टायटन्सची धुलाई

Maharashtra Premier League, 2025 : महाराष्ट्र प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रत्नागिरी जेट्सने दमदार कामगिरी करत इगल नाशिक टायटन्ससमोर तगडे लक्ष्य उभे केले. धीरज फटांगरेने संयमी आणि स्मार्ट फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं, तर कर्णधार आझीम काझीने आक्रमक शैलीत फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं.
Published on

Ratnagiri Jets vs Eagle Nashik Titans : आजपासून सुरू झालेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) २०२५ स्पर्धेत गतविजेत्या रत्नागिरी जेट्सने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथे झालेल्या या लढतीत गत उपविजेता इगल नाशिक टायटन्स संघासमोर रत्नागिरीने तगडे लक्ष्य उभे केले. धीरज फटांगरेचे ( Dhiraj Phatangare) अर्धशतक व कर्णधार आझीम काझीच्या दमदार खेळीने रत्नागिरीला सावरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com