MPL 2025 : सांघिक कामगिरीच्या जोरावर यश : प्रशांत सोळंकी
Prashant Solanki : प्रशांत सोळंकीच्या नेतृत्वात ईगल्स नाशिक टायटन्सने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाच्या संघभावनेला असल्याचे त्याने सांगितले.
पुणे : अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याचे श्रेय आमच्या संघातील माझ्या प्रत्येक सहकार्याचे तसेच संघाबरोबर असलेल्या सर्व सपोर्ट स्टाफच्या सहकार्याचे हे फलित आहे, असे मत ईगल्स नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार प्रशांत सोळंकीने विजयानंतर व्यक्त केले.