
पुणे : कर्णधार अझीम काझी, धीरज फटांगरे व सत्यजीत बच्छाव यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावोर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ६७ धावांनी पराभव केला. ७२ धावांची खेळी साकारणारा अझीम काझी सामन्याचा मानकरी ठरला. पहिल्या तीन सामन्यांतील पराभवानंतर गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.