Maharashtra Premier League Sakal
MPL&WMPL
MPL 2025 : सातारा - रायगडमध्ये आज लढत रंगणार, रत्नागिरी-पुणेरी बाप्पामध्येही रस्सीखेच
Maharashtra Premier League : अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील मंगळवारी रायगड-सातारा आणि रत्नागिरी-पुणेरी बाप्पा हे दोन महत्त्वाचे सामने रंगणार असून चाहत्यांचे लक्ष या लढतींवर केंद्रित झाले आहे.
पुणे : अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील सोमवारच्या साखळी फेरीतील लढतींवर पावसाने पाणी फेरल्यानंतर आता मंगळवारच्या लढतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सातारा वॉरियर्स-रायगड रॉयल्स व रत्नागिरी जेट्स-चार एस पुणेरी बाप्पा या दोन लढती उद्या (ता. १७) रंगणार आहेत.