पुणे : अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाचे युवा गोलंदाज शुभम कदम आणि तनय संघवी यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. .दडपणाखाली गोलंदाजी करताना अचूक टप्पा, दिशा आणि फलंदाजांची खेळी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही जबाबदारी आम्ही आनंदाने स्वीकारली असून संघासाठी सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली..गोलंदाजीत सातत्याचा ठसानाशिकचा तनय संघवी सध्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या अचूक माऱ्यामुळे रायगड रॉयल्सचे आक्रमण डावाच्या मधल्या षटकांमध्ये अधिक धारदार झाला आहे. शालेय स्तरापासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आलो आहे. पुण्यात १६ वर्षांखालील गटातील स्पर्धेने माझ्या कारकीर्दीला खरी दिशा दिली. कोरोना काळात फार कठीण काळ अनुभवला; पण माझे प्रशिक्षक हर्षद पाटील यांनी सातत्याने मार्गदर्शन आणि मानसिक आधार दिला. त्यामुळेच मी पुन्हा नव्याने सुरुवात करू शकलो, असे तनय म्हणाला..खेळपट्टीच्या अनुकूलतेवर भाष्य करताना तो म्हणाला, गहुंजेतील ट्रॅक माझ्या गोलंदाजीस पूरक आहे. मी फलंदाजांचे पदलालित्य त्यांची फटकेबाजीची शैली यांचा अभ्यास करतो आणि त्यानुसार माझ्या चेंडूंचा वेग, लाइन आणि लेंथमध्ये बदल करतो. हेच माझ्या यशाचं गमक आहे. दौंड तालुक्यातील वरवंड गावातून आलेला शुभम कदम आपल्या अचूक आणि नियंत्रित गोलंदाजीमुळे विरोधी संघाची धावगती रोखण्यात यशस्वी ठरला आहे. .केडगाव येथे सराव सुरू केला. नंतर केडन्स अकादमीत शास्त्रोक्त ट्रेनिंग मिळालं. त्यानंतर मी एमसीएच्या १६ आणि १९ वर्षांखालील गटातील स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवली. प्रीमियर लीगपूर्वी एमसीएने घेतलेल्या सराव शिबिरातील कामगिरीमुळेच रायगड संघात स्थान मिळालं, अशी माहिती शुभमने दिली. खेळपट्टीबाबत त्याने सांगितले, पावसामुळे काही मर्यादा जरूर निर्माण होतात, विशेषतः चेंडूवरची पकड घट्ट असल्यामुळे मी नेहमीच टप्पा आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतो. फलंदाजांना रोखणं ही माझी खासियत आहे आणि ती भूमिका मी यशस्वीपणे पार पाडत आहे..MPL 2025 : पुणेरी बाप्पाविरुद्ध नाशिक टायटन्स लढत; रायगड रॉयल्ससमोर कोल्हापूर टस्कर्सचे आव्हान.युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधीमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा राज्यातील होतकरू क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोलाची ठरली आहे. रायगड रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या शुभम आणि तनयसारखे युवा खेळाडू ही स्पर्धा आत्मविश्वासाने आणि धाडसाने खेळत असून, भविष्यातील मोठ्या संधींसाठी स्वतःची सिद्धता सप्रमाण सिद्ध करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.