
पुणे : ईश्वरी सावकार (७८ धावा), ईश्वरी अवसरे (५२ धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३० धावांनी पराभव केला. सोलापूर स्मॅशर्स संघाने गुणतालिकेत चार विजय, एक पराभवासह दुसरे स्थान कायम राखत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.