Vicky Ostwal : मोठ्या भागीदारीमुळेच समन्वय वाढतो; एमपीएल : रायगड संघाच्या ओसवालचे मत
RaigadVsKolhapur: रायगड संघाचा खेळाडू विकी ओसवाल याने कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ५४ चेंडूंमध्ये ७४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सांगितले की संघातील भागीदारीमुळेच सामन्यात यश मिळवता येते.
पुणे : संघातील दोन सहकाऱ्यांमध्ये मोठी भागीदारी होते तेव्हा संघातील खेळाडूंमध्ये समन्वय वाढतो आणि हा समन्वय ऊर्जा देत तुम्हाला यशही मिळवून देतो, असे रायगड संघाचा खेळाडू विकी ओसवाल याने सांगितले.