
- अमोल शिंदे
काही गोष्टी केवळ आरंभ करणे पुरेसे नसते, तर त्या दीर्घकालीन परिवर्तनासाठी बिंबवाव्या लागतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA)तर्फे आयोजित केलेली पहिलीच ‘महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (WMPL) ही स्पर्धा म्हणजे अशाच एका ऐतिहासिक पावलाची सुरुवात आहे, ॉ
ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातील नवोदित महिला खेळाडूंनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील महिला क्रिकेट संघटनांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे.