
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) २०२५ स्पर्धेत दुसऱ्या लढतीत रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली. रत्नागिरी जेट्सच्या विजयात गौतमी नाईकने केलेल्या अर्धशतकी खेळीचा मोठा वाटा राहिला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना रायगड रॉयल्स संघाने २० षटकात ८बाद १५९ धावा केल्या.