
महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधत आहेत. जवळपास रोज क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. नुकताच रविवारी रायगड रॉयल्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे झालेल्या सामन्यात रायगडच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सने ७ विकेट्सने विजय मिळवला.