
Maharashtra Women's Premier League 2025: पुण्यामध्ये आजपासून (ता. ५) महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगची (डब्ल्यूएमपीएल) रंगत पाहायला मिळणार आहे. पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, पुष्प सोलापूर आणि रायगड रॉयल्स या चार संघांमध्ये जेतेपदाची झुंज रंगणार आहे. स्मृती मानधना, किरण नवगिरे, अनुजा पाटील व इश्वरी अवसरे या चार खेळाडूंची आयकॉन खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.