
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला बुधवारपासून (४ जून) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाला पराभवाचा धक्का दिला.
पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या या स्टेडियममध्ये नाशिक संघाने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. नाशिक संघाच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज मंदार भंडारीने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.