स्त्रीच्या साहसाची सर्वार्थ गाथा : बाईची भाईगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book Review

स्त्रीच्या साहसाची सर्वार्थ गाथा : बाईची भाईगिरी

जगाची जननी आहे स्‍त्री. तिच्या कर्तृत्वाच्या गाथाही अफाट आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती धडपडत असते. क्रूर समाजव्यवस्था, काही दृष्ट पुरुषांची वासना, त्यांच्या अत्याचारांतून स्वतःला सावरण्याची जिद्द आणि समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तिला कठोर व्हावंच लागतं. त्यातूनच जन्माला येते ती गुन्हेगारी प्रवृत्ती. मग कधीकाळी कोमल हातांनी आपल्या बाळाला जेऊ घालणारी ‘ती’ हातात बंदूक घेऊन दृष्टांचा समाचार घेऊ लागते. अशाच नियतीच्या खेळातून गुन्हेगारीकडे वळलेल्या ११ स्त्रियांची कहाणी सुरेखा बोऱ्हाडे यांनी ‘बाईची भाईगिरी’ या पुस्तकातून मांडली आहे.

हेही वाचा: संपादकांच्या लेखणीतून : एक होती एसटी... असं होऊ नये!

जन्मतः कोणीच गुन्हेगार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसतो. पण, त्याच्यापुढे उभी राहिलेली परिस्थिती त्याला तसे करायला भाग पाडते. या पुस्तकात एक सामान्य स्‍त्री ते तिची भाईगिरी, असा या स्त्रियांचा विस्तृत प्रवास लेखिकेने मांडला आहे. विशेष म्हणजे, या प्रत्येक स्त्रीचा गुन्हेगारीच्या वाटेवरचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचे चित्रण करतानाही लेखिकेने थेट ते पात्रच डोळ्यांसमोर उभे राहील एवढ्या कौशल्याने हाताळले आहे. आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे सांगायचे झाल्यास, एखादी वेबसिरीज बघितल्याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो. स्त्रीशक्तीचे हे वेगळे रूप दाखवणारे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री रेखा बैजल यांची प्रस्तावना लाभली आहे.

पुस्तक : बाईची भाईगिरी

प्रकाशक : चपराक प्रकाशन

पृष्ठसंख्या : ११२, मूल्य : १५० रुपये

- प्रतिक जोशी

हेही वाचा: प्रेमाचा विजय अन् दोनदा लागलं लग्न

टॅग्स :marathi bookse sakal