नोटाबंदी : अतुलनीय आणि मजबूत लोकशाहीची साक्ष!

नोटाबंदी : अतुलनीय आणि मजबूत लोकशाहीची साक्ष!
नोटाबंदी : अतुलनीय आणि मजबूत लोकशाहीची साक्ष!

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो

या सानेगुरूजींच्या ओळी आज सार्थ ठरत आहे ! संपूर्ण जगात भारताची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी जनता शासनाला सहकार्य करत आहे.भारतात आज प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत झाली त्याला निमित्त नोटाबदल. सद्यस्थिती अशी आहे कि बॅंकामध्ये 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याकरिता दररोज सामान्य माणसाच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. आता या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु होण्यास मुख्य सूत्रधार पंतप्रधान होत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता घोषणा केली की 500 व 1000 च्या सध्या चलनात असलेल्या नोटा रद्द होत आहेत. नंतर 11 नोव्हेंबर पासून नोटा बॅंकेत बदलून दिल्या जातील, असेही त्यांनी त्याचवेळी सांगितले. 8 तारखेला उशिरा घोषणा देण्याचे कारण सराफा बाजार, मोठे व्यापारी मार्केट बंद होतात. त्यामुळे त्यांना त्या दिवसात जास्त अर्थविषयक हालचाली करता आल्या नाहीत. परंतु त्या रात्री सामान्य माणसाला ATM मधून पैसे काढता आले, कारण मोदींनी रिर्झव्ह बॅंक ऑफ इंडियाला 100 च्या नोटा आठवडाभर आधीपासून जास्त उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले होते. म्हणून बॅंकेत व ATM म धून 100 च्या नोटा उपलब्ध झाल्या. 9 व 10 नोव्हेंबरला बॅंका बंद ठेवून प्राप्तीकर विभागाला बॅंकांचे सर्व्हर कनेक्‍ट केले गेले. त्यामुळे तुमच्या पॅनकार्ड नंबर आणि तुमच्या नावाचे अकाऊंट नंबर जोडून तुम्ही किती रक्कम जमा केली त्यावर एकूण टॅक्‍स मोजला जाणार आहे. यात तुम्ही वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा केली तरी तुम्हाला एका पॅनकार्ड नंबरमुळे एकूण जमा रकमेवर टॅक्‍स बसणार. म्हणजे मा. पंतप्रधानाची व्यूहरचना प्रशंसनीय आहे!

आता या नोटा बदलून घेताना सामान्य माणूस खूपच त्रास घेतो आहे. कारण नोटा बदलून मिळत आहेत. पण दिवसाला मर्यादा 4000 रुपये. शिवाय रोज कमाल 4 ते 5 तास रांगेत उभा राहून 2000 रुपयाची नवीन नोट मिळत आहे. बाजार किंवा दुकानात गेल्यावर आपण सहसा 2000 रुपयाची खरेदी करत नाही. रोजच्या खरेदीला 2000 रुपये इतके गरजेचे नाहीत. जुन्या झालेल्या 500 आणि 1000 ची नोट घेऊन गेले, तर संपूर्ण रकमेची म्हणजे पूर्ण 500 आणि 1000 रुपयांची खरेदी करावी अशी सक्ती करत दुकानदार सामान्य व्यक्तीला अडवून व्यवहार करत आहेत. नोटाबदल फक्त 500 आणि 1000 नोटांचा झाला. पण इतर नोटांची उणीव भासत आहे. कारण जास्तीच्या खर्चावर लोकांनी आता आळा घातला आहे. बरेच अनावश्‍यक घरगुती, श्रीमंत वर्गांनी पार्ट्या, पबमध्ये जाऊन उधळपट्टी कमी केली आहे. तसेच जुन्या नोटा जमा करण्यासाठी म्हणून आता कर्जभरणा जनता करत आहे, यातूनच नकळत काही प्रश्न सुटत आहे!

बॅंकेत नोटाबदल करून देताना कर्मचारी वर्गाला शहरात दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत. एक कर्मचारी काम करत असताना मृत्यू पावला. शिवाय नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत असलेले वयस्कर व्यक्ती यांचाही मृत्यु झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचे खापर नोटाबदल यावर फोडणे मुळात चुकीचे आहे. कारण लोकांकडे पैसे असतानाही नोटाबदलाची घाई किंवा अतिटेंशन घेऊन स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे जीव धोक्‍यात घालतात. काही जण तर विनाकारण बॅंकेजवळ जाऊन गर्दी करतात. वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न इतरांशी बोलून किंवा भांडून करतात. अशांना लगेच चाप बसवावा. सध्या एटीएममधून 2000 रू ची नोट मिळत आहे. शिवाय काही तासातच एटीएममधील पैसे संपत आहेत. कारण मागणी जास्त तसा पुरवठा तोकडा पडतो. यातून सामान्य जनतेची पुरती धांदल उडते आहे! बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांनाही नोटा 500 व 1000 या नोटा सोडून इतर नोटा जास्त नसल्याने त्रास झाला .जास्तीत जास्त लोकांना ई-बॅंकिंग सेवेचा उपयोग करावा असेही बॅंका व गॅस एजन्सी, प्रीपेड बॅलन्स,ऑनलाईन खरेदी करण्याचे पर्याय उपयुक्त आहेत.

भारताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे सर्व नोटा बदल होण्यास वेळ लागणार आहे यात काही शंका नाही. तसेच नोटा बदलासाठी सर्वांना सहकार्य शेवटपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारणही नाही. एकूण भारतात शांत वातावरणात नोटा बदल होत आहे, यावरून लक्षात येते की, पूर्ण भारतीय जनता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटा बदलाच्या निर्णयाला स्वीकार करते. नोटाबदल होण्याची दोन कारणे सांगितली जातात, पहिल नकली नोटांचे प्रमाण वाढले होते. बरं या नकली नोटा आल्या कोठून? भारतीय उपखंडात सगळीकडे नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा एकाच प्रकारचा कागद पुरवला जातो. त्यामुळे पाकिस्तानने 500 च्या नकली नोटा तयार करून समुद्र मार्गाने भारतात नोटा पाठविल्या होत्या. पाकिस्तानच्या या नीच कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताचे पंतप्रधान आणि RBI चे गव्हर्नर यांनी गोपनीयता बाळगत 2000 रुपयाच्या नोटेसाठी वेगळा कागद विकत घेतला. तसेच नोटेवर डिझाईन व रंग बदले. नोटेवरील संदेश बदलला. जो सहसा कॉपी केला जाणार नाही. 500 च्या नकली नोटा बंद झाल्या आणि पाकिस्तानला धक्का बसला कारण दहशतवादी हल्ले तर करत होताच आता भारताची अर्थव्यवस्था पाडायला निघाला होता. म्हणजे महासत्ता होणाऱ्या भारतवार हा आर्थिक हल्ला होता आणि तो फक्त मा. नरेंद्र मोदी यांनी ओळखलाच नाही; तर, त्यावर सर्जिकल स्ट्राईक करत मोठ्या आर्थिक संकटापासून देशाला वाचवले आहे.

दुसरे कारण असे कि भारतात महागाई सतत होण्याचे कारण काळा पैसा! काळा पैसा म्हणजे उपयोगात न येणार जो श्रीमंत वर्ग जमा करत असतो हा काळा पैसा रोख रक्कम, सोने, हिरे, प्रापर्टी या स्वरुपात असतो. यातील फक्त रोख रक्कम बॅंकेत 500 आणि 1000 च्या नोटा जमा करून त्या बदली 2000 च्या व इतर नोटा मिळणार त्यामुळे काही प्रमाणत काळा पैसा बाहेर येणार व महागाई कमी होणार. कारण रोख व्यवहारात नोटांची संख्या वाढेल म्हणजे रुपयांची संख्या, किंमत वाढणार! आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमूल्यन होणार नाही, याही दृष्टीने योग्य निर्णय आहे. नोटा छापताना RBI ला चांदी विकत घ्यावी लागते. यांचे नोटेत प्रमाण ठरविलेले असते. काळा पैसा झाल्यास पुन्हा पुन्हा नोटा छापून द्याव्या लागतात. म्हणजे नोटेतील प्रमाण कमी होत गेल्यास रुपयाची किमत घसरून अवमूल्यन होते. असे झाले की इतर देशाच्या प्रमाणात आपल्या किंमतीत फरक होतो. एका परकीय रुपयासाठी आपल्याला भारतीय चलनातील खूप रुपये मोजावे लागतात मग आपली परकीय गंगाजळी कमी होत जाते.

नोटाबदलामुळे आपण नकली नोटा आणि काळा पैसा या संकटातून सूटलो आहोतच यातून देशाला पोखरणाऱ्या भष्ट्राचार वाळवीतून मुक्त होतील अशी अपेक्षा आहे कारणअसाच एखादा निर्णय नव्हे कृती भष्ट्राचार विरोधी व्हावी! 200 च्या नोटेत चीप आहे अशी सुद्धा अफवा होती कि हि नोट जमिनीच्या खाली 20 फुटापर्यंत कोठे आहे हे समजेल आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा कोठे होत असेल तिथे मागोवा चीपने घेवून प्रश्न मार्गी लागतील, हि मजेची गोष्ट होती ! या नोटाबदलातून सामान्य माणसाला त्रास असला तरी मोठ्या आर्थिक संकटातून सुखरूप निभावलो आहोत म्हणून नोटा बदल विधायक कार्यक्रम ठरला आहे !

भारताची लोकशाही अतुलनीय आणि मजबुत असल्याचे साक्ष पटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com