वडिलांच्या मृत्यूचं दुःखं उरात घेऊन लढला माणिक

मतीन शेख
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कुस्ती हा श्रीमंताच्या मुलांसाठी खेळ मुळीच नाही, अनेक गोर गरीबांचीच पोरं पैलवान होतात. चटणी भाकर खाऊन, मोल मजुरी करुन आपल्या पैलवान मुलाला बदाम, दुधाच्या खुराकासाठी आई- बाप पैसा पुरवत असतात. त्यानं कुस्ती खेळुन खुप पैसा मिळवावा यासाठी नाही तर... आपल्या पोरानं नाव करावं आपलं, आपल्या गावाचं. तांबड्या मातीची सेवा करावी एवढ्यासाठी हा अट्टहास असतो...

हे टक्कल केलेलं पोरगं वरच्या फोटोत दिसतंय ना... त्याचं नाव माणिक मधुकर कारंडे, गाव त्याचं कोल्हापूरजवळचं करवीर तालुक्यातलं सावर्डे दुमाला.

पुण्यात संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात ६५ किलो वजनी गटात त्यानं अनेक पैलवानांना लोळवून सुवर्ण पदक जिंकलं आणि तो महाराष्ट्र चॅम्पियन बनलाय.

चार दिवसांपूर्वीच माणिकचे वडील वारले... आपला पोरगा चांगला पैलवान बनावा असं याच्या वडिलांचं स्वप्न. पण आपल्या पोराचं यश पाहण्यासाठी ते आज या ठिकाणी नाहीत.
फक्त डोक्याचे केस काढून आणि मुख अग्नी देऊन आपल्या बापाचं ऋण फेडण्याचं काम माणिकने केलं नाही, तर सुवर्ण पदक जिंकूनच ऋण फेडण्याची इर्षा माणिकने पूर्ण केली.

कुस्ती हा श्रीमंताच्या मुलांसाठी खेळ मुळीच नाही, अनेक गोर गरिबांचीच पोरं पैलवान होतात. कारण घाम गाळण्याची क्षमता ही नेहमीच गरीबांमध्ये असते.

चटणी भाकर खाऊन, मोल मजुरी करुन आपल्या पैलवान मुलाला बदाम, दुधाच्या खुराकासाठी आई- बाप पैसा पुरवत असतात. त्यानं कुस्ती खेळुन खुप पैसा मिळवावा यासाठी नाही तर... आपल्या पोरानं नाव करावं आपलं, आपल्या गावाचं. तांबड्या मातीची सेवा करावी एवढ्यासाठी हा अट्टहास असतो...

आपल्या वडिलांचं आपल्यातून अकाली निघून जाणं माणिकला खूप त्रासदायक असेल... आपल्या जवळच्या माणसाचं दूर जाणं यासारखा मोठा विरह दुसरा कोणताच नसतो... पण माणिकने हे दुःख पचवलं आणि घायाळ वाघासारखा लढला व विजयश्री काबीज करून आपल्या बापाचे ऋृण फेडले...

हीच तर खरी खासीयत आहे कुस्तीची, तांबड्या मातीची...
कुस्ती नेहमी लढायला शिकवते, संघर्ष करायला शिकवते मग ते आखाड्यात असो किंवा समग्र जीवनात असो. परिस्थितीसमोर दोन हात करुन उभे ठाकायला शिकवते ती कुस्ती...
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manik karande fought with the pain of father's demise in heart

फोटो गॅलरी