गुरूपौर्णिमा : आषाढी पौर्णिमेच्या महत्त्वाच्या चार घटना 

guru pornima
guru pornima

शाक्‍यमुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस अशा काही चार महत्त्वाच्या घटना घडल्या की ज्यांच्या चर्चेशिवाय बुद्ध गचरित्राला परिपूर्णता येणेच शक्‍य नाही. 


पहिली घटना ः राणी महामायेचे स्वप्न 

स्वप्न ही एक अशी वैयक्तिक अनुभूती आहे; की ती प्रत्येक स्त्री- पुरुषाच्या जीवनात नेहमी येतच असते. स्वप्नही शेवटी स्वप्नच असते. ते खरे झालेच पाहिजे, असा कोणी आग्रह धरीत नाही. उलट सत्यात कधीही न उतरणाऱ्या बाबींसाठी स्वप्न म्हणण्याची रीत रूढ आहे. राणी महामायेचे स्वप्न मात्र रूढ अर्थाने स्वप्न या व्याख्येत बसणारे नव्हते. जेव्हा- जेव्हा बौद्ध साहित्यात स्वप्न या विषयावर चर्चा सुरू होते. तेव्हा तेव्हा आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्ण होते. या स्वप्नात राणीने पाहिले की चारही दिशेने दूत येतात. राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या हिमंवंत प्रदेशातील एक शाल वना जवळील अनुवादः नावाच्या सरोवरावर नेतांना सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षा खाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपाने सर्वांगास सजवून राणी स्नान घालतात. स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात. त्यानंतर राणी सुगंधी फुलांनी सुवासीक अत्तर यांनी असे काही सजवतात, की राणी एका सुंदर वनकन्या सारखी दिसू लागते. काही वेळाने सहा दातांचं शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमल पुष्पांची माळा धारण केलेली असते, राणीच्या भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न राजा शुद्ध ना सांगितले, तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म, ध्वज, लक्‍खन, मंत्री कोण्डज, भोज सुयाम आणि सुदत्त या 8 स्वप्न शास्त्रांना दरबारात बोलावून घेतले. त्यांना जेव्हा स्वप्नाचं सविस्तर वृत्तांत कथन करून या स्वप्न शास्त्रींना या राणीच्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला. सर्व एकूण झाल्यानंतर त्यांपैकी जो सर्वात वृद्धशास्त्री होता. त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला राजन आपण "स्वप्न संबंधी कसलीही चिंता करू नये निश्‍चिंत रहावे हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ मंगलमय आहे ".आपल्या घरी येईल राजपुत्र लवकरच जन्मास येणार आहे. या स्वप्नाच्या द्वारेराणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा झालेली आहे. म्हणूनच या पौर्णिमेला 'गर्भमंगलमय दिन' म्हणतात. जगभरातील बौद्ध हा दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न करतात. तो शुभ दिन म्हणजे आषाढी पौर्णिमा इ.स.पू. 564 

दुसरी घटना गौतमाचा गृहत्याग 
सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्याग आजची घटना मज्झिम निका यातील अतिपरियेसनं सुत्तात भगवंतांनी कथन केलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात कथन केलेली आहे. सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचे नाव शुद्धोधन शक्‍य वंशीय राजा सिद्धार्थ हे राजवंशी हे नाव असून त्यांचे गोत्र गौतम किंवा गौतम होतो ते सूर्यवंशी घराण्यातील प्रसिद्ध वाक वाकू कुळातील असून कपिलवस्तु नगरी चा राजा होय शुद्ध धनाची राजधानी कपिल वस्तू ही कपिलवस्तु नगरी भारत देशात उत्तर प्रदेशात वाराणसीच्या उत्तरेला 140 किलोमीटरवर हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे 65 किलोमीटरवर रोहिणी नदीच्या काठावर वसलेली होती या राज्याची शासन व्यवस्थित संघ किंवा गणराज्य असे म्हणतात शेतक-यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते ते आळीपाळीने राजसत्ता चालवित राजपुत्र सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राज्यसत्ता उपभोगण्याचा माणूस सिद्धार्थाची पितात यांचा होता राजा शुद्धोदन आची सत्ता कपिल वस्तूवर होती तथापी कपिलवस्तु हे एक सोशल नरेश प्रसेनजित या राजाचे मांडलिक राज्य सोशल नरेश आपल्या राजसत्तेने काही कधी कर यांना वापरता येत नसते. कपिलवस्तुच्या शेजारी रामग्रामचे कोलिय यांचे राज्य होते. या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे, रोहिणी नदीचे पाणी शाक्‍य व व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत. असे हा वाद कायमचं बाईचा असेल तर तो युद्धाने स्मित व्हावा असा निर्णय शाक्‍य संघाने आमसभेत घेतला याच आमसभेत सिद्धार्थ गौतमाने असे घोषित केले की संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे शुद्धोधनाने हा प्रश्‍न सोडवता दोन्ही बाजूंकडील 2=2 प्रतिनिधी निवडून यावेत आणि त्यांनी 5 वा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा,, असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले. मत म्हणजे शाक्‍य संघाने घेतलेला निर्णयाला आव्हान होते. जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो व संघाचा आदेश मोडतो त्या संघ शासन आल्याशिवाय सोडत नसे संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूट पणे करणे हे संघाच्या प्रत्येक सभासदाचे आद्यकर्तव्य असे. संघाचा आदेश गौतमाने मोडला म्हणून त्यास शिक्षा दिली व त्या शिक्षेचे तीन पर्याय संघाने गौतमा समोर सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे, देहांतशासन स्वीकारणे अथवा देश त्याग करणे, कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कार अस राजी होणे हे पर्याय ठेवले. यापैकी पहिला पर्याय तर गौतम आस मान्य होणे कदापि शक्‍य नव्हते कारण त्याच्या विचारात युद्ध विरोध ठासून भरलेला होता. तिसरा पर्यायही त्यास मान्य नव्हता; कारण या निर्णयात कुटुंबाचा काहीही दोष नव्हता संघाच्या दृष्टीने दोष कोणाचा असेलच तर तो गौतमाचा होता. म्हणून दुसरा पर्याय गौतमा लागू होतो. त्यातीलही पहिली शिक्षा सिद्धार्थ मान्य नव्हती कारण देहदंड त्यास दिला जातो जो देश द्रोहा सारखा गंभीर अपराध करतो. तेव्हा देह दंडाचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला पर्याय देश त्यागाचा त्यावर सिद्धार्थाने संघास असे सांगितले की, देशत्याग पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने केव्हाही तयार आहे सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देश त्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला. पुढे राजपुत्र सिद्धार्थस देशत्याग करावा लागला ही वार्ता कोशल नरेश प्रसेनजित यास समजली. तर तो शाक्‍य संघास जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सेनापतीस वाटत होती. सेनापतीच्या या शंकेश गौतमा जवळ उत्तर होते. तो म्हणाला मी परिव्रजा घेऊन देश सोडेन यामुळे कोशल नरेशास शंका सुद्धा आता येणार नाही. यावर सेनापतीने दुसरी एक शंका उभी केली. ती म्हणजे माता पिता आणि घरच्या सर्वांचे अनुमती घेतल्याशिवाय परिव्रजा घेता येत नाही. यावरही ही राजपुत्र गौतमाने मोठ्या धैर्याने ही शंकाही दूर केली पत्नी यशोधरा व त्याने राजाराणी कडून मोठ्या कष्टाने अनुमती मिळविली मातापित्यांनी दुःखी करणारे अंतकरणाने अनुमती दिली. त्याच बरोबर युवराज्ञी यशो धरेचे या वेळेचे विचार ऐकून राजपुत्र गौतम प्रभावित झाला यशोधरा म्हणाली आपला निर्णय योग्य आहे. मीही तुमच्याबरोबर परिव्रजा घेतली असती, पण आपल्या पाठीमागे बाळ राहुल ते संगोपन करण्याची जबाबदारी मजवर पडणार आहे. आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात. तेव्हा आपण असा एखादा जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हे ऐकून गौतम आज फारच समाधान वाटले. आपल्याला अशिष शूर धैर्यवान व उदात्त मनाची पत्नी मिळाल्याबद्दल गौतम स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांनी यशोधर इला पुत्र राहुल्या आणावयास सांगितले एक वेळ त्याच्याकडे पीतृत्वाच्या नजरेने पाहिले आणि त्याने तो महाल सोडला. दुसऱ्यादिवशी आपला आवडता घोडा 'कंथक' यावरून आरुढ होऊन आपला प्रिय शेवक 'छन्न' यास सोबत घेऊन त्याने कपिलवस्तु चा निरोप घेतला तो दिवस होता सोमवार आषाढ पौर्णिमा इसपू 534 त्यावेळी गौतमाचे वय होते 29 वर्षाचे या गृह त्यागाच्या घटनेस गौतमाचे महाभिनिष्कमण असे म्हणतात या पौर्णिमेस मा बनी इश्‍क मन दिवस म्हणून विश्वातील सर्व व बौद्धजन साजरी करतात. 

तिसरी घटना पंच वर्गीय भिक्‍खूंची दीक्षा 
भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणाला सांगावे किंवा सांगू नये असा प्रश्न तथागत तास पडला संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की आत्मकल्याण पुरताच तोच अमित ठेवावा असा विचार ते करू लागले या याला बुद्धांचा विषाद्योग असे म्हणतात. तथागता असे वाटते की, मला धम्माचे ज्ञान मिळाले; हे खरे परंतु प्रत्येक सामान्य व्यक्तीला ते समजणे व त्याचे अनुकरण करणे कठीण आहे बुद्धिमान लोकांसाठी देखील ते अतिसूक्ष्म आहे. माणसाला आत्मा आणि परमात्मा यांच्या मोहजाला मधून निघणे कठीण आहे. त्याला रितीरिवाज रूढी आणि धार्मिक संस्कार यांच्या बंधनातून निघणे कठीण आहे. ब्राह्मणी धर्म वादापासून मुक्त होणे कठीण आहे. लोकांना आत्मा नित्य आहे त्याचा स्वीकारलेल्या सिद्धांतापासून मुक्त होणे कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताचा उपदेश दिला व लोकांना तो समजलं नाही किंवा समजून देखील त्यांनी जर त्याचा स्वीकार केला नाही. चालेल किंवा स्वीकार केल्यावर देखील ते जर त्यानुसार आचरण करू शकले नाही. तर लोकांनाही व्यर्थ श्रम होतील व मलादेखील उगाचच त्रास होईल. मी संन्याशी राहून स्वतःचे कल्याण निश्‍चित करू शकतो, याप्रकारे भगवंताचे मन सुरुवातीस सद्दाम मामाच्या प्रचारा कडे न चुकता निष्क्रिय तेकडे झूकले. 
किच्छेन मे अधिगतं हलं दानि पकासितुं 
रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसंबुध्दो 
परिसोतगामि निपुणं गंभिर दुद्दंस अणुं 
रागरत्ता न दक्‍खन्ति तमोखन्धेन आवुटा ति..! 
अर्थ- मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान मला झाले आहे. आता ती लोकांना सांगण्यात अर्थ दिसत नाही. कारण लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक हे जाणू शकणार नाहीत. हा मार्ग लोक प्रवाहाच्या उलट जाणार आहे हा ज्ञान युक्त आहे. हा गंभीर आहे. हा दुर दिगम आहे आणि हा सूक्ष्म आहे. अज्ञानावर नाणे अच्छा नदीत व कामासक्त मनुष्यांना याचे ज्ञान होणार नाही. शेवटी तथागतांनी विचार केला. सर्व जगात शांती प्राप्त व्हावी दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे तर आवश्‍यक आहे. तेव्हा या धम्माचा इतिहास उपदेश केला पाहिजे, असा विचार करून आपणास प्राप्त झालेल्या ज्ञानाचा इतरांस दम उपदेशात द्वारे तो देण्याचा निश्‍चय तथागतांनी केला. सर्वप्रथम हा धम्म कोणाला द्यावा असा विचार करता त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली तथागताच्या विद्वान शहाणा बुद्धिमान व शुद्ध चरणी होता परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले त्यानंतर उदक रामउत्तराला धम्म उपदेश देण्याचा विचार त्यांनी केला. परंतु तोही आठ दिवसांपूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. निरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ गौतमाच्या घोर तपश्‍चर्या कालावधीत जे पाच शिष्य त्यांच्याबरोबर होते परंतु सुजाताच्या ग्रहणानंतर गौतमाने तपस्या व का या देशाच्या त्याग केला. त्यामुळे ते रागावून निघून गेले होते. त्यांना हा सद्दम सर्वप्रथम सांगावा हा विचार करून तथागत आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समजले की हल्ली ते वाराणसी येथे आहेत. त्यांनी भेट देण्यासाठी भगवान वाराणसी येथील सारणात जवळील मृग दाय गेले लांबूनच त्या पंचवर्गीय टभिक्षूंनी पाहिले की सिद्धार्थ आपल्याकडे येतोय. त्यांचा गौतमा वरचा राग अजून पुरता गेलेलं नव्हता. अश्वजीत श्रमण म्हणाला हा तोच गौतम आहे. जो सुजाताची खीर खाऊन सोडून भ्रष्ट झाला आहे. आता परत इथे आला आहेत. त्यानंतर लगेच कौण्डिण्य म्हणाला, आपण त्याच प्रणाम करायचा नाही. उठून उभे राहून त्या सन्मान द्यायचं नाही. कश्‍यप म्हणाला त्यास बसण्यासाठी आसन द्यायची नाही. ही त्याचे चीवर सांभाळायचे नाही बाकीचे श्रमण महानाम व बद्रिक अथवा यांनी त्यांना समर्थन केले. त्यामुळे त्यांनी ठरविले की गौतमाचे स्वागत करायचे नाही, कारण त्या गौतम श्रमदानाने तपस्येचा मार्ग सोडून वैभव आणि विलास जीवनाचा अंगीकार केला आहे. त्यामुळे आपण तो आला म्हणजे, उभे राहायचे नाही . त्याचे आदरतिथ्य करायचे नाही. त्यांच्यासाठी बाजूला एक आसन ठेवून देऊ इच्छा असेल, तर तू त्यावर बसेल अन्यथा आला. तसा निघून जाईल बुद्धाने ज्या 5 परिव्राजकांना दीक्षित करायचे ठरवूनच त्यांचा शोध घेत इथपर्यंतचा प्रवास केला. होता ते येथे बसले होते तेथपर्यंत तथागत स्वतःहून संत पावले टाकत चालत गेले. तथागताचा जवळ येईपर्यंत त्यांचे स्वागत करण्याचा निश्‍चय करून निर्विकारपणे बसलेले ते ब्राह्मण श्रवण तेव्हा त्यांचा तो दृढ निश्‍चय विसरले कधी त्यांचा विरोध करून पडला हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. भगवंताचे व्यक्तिमत्वच इतके प्रभावी होते, की त्यांचे प्रभावित होऊन ते चुंबकाच्या कडे जसे लोखंड आकर्षित व्हावे तसे ते सर्व प्रभावित झाले. त्यांचा आधीच गौतमाचा सत्कार न करण्याचा निश्‍चय असा गळून पडला. जसा वाऱ्याच्या झोताने पिकलेला आंबा झाडावरून गळून पडावा ते सर्वच्या सर्व श्रम न तथागतांच्या स्वागतासाठी उठून कोणत्या क्षणी उभे राहिले... हे कोणासही समजले नाही आणि आपल्या हाती बुद्धाचे पात्र घेतले एकाने चिवर सांभाळले, एकाने आसन स्वच्छ केले, तर बाकीचे त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणावयास धावले. या स्वागतानंतर या सर्वांनी भगवंतास त्यांच्या दीक्षा देण्याची नम्र विनंती केली. बोधी प्राप्तीनंतर तथागताचे हेच पहिले 'धम्मचक्र प्रवर्तन' होय .ज्या स्थळी हे पवित्र 'धम्मचक्रप्रवर्तन 'घडून आले. ते स्थान म्हणजे 'सारनाथ 'येथील ऋषीपतन 'मृगदाय'वन होय. असे म्हणतात त्रीसरणा मधील प्रथम सूत्र 'बुद्धम सरणं गच्छामि' हे बुद्ध गये मध्ये जन्मले ,तर उर्वरित दोन्ही सुत्त "धम्मं शरणं गच्छामि, संगम शरणम गच्छामि" सारनाथ येथे जन्मास आले. यावरून यावरून बौद्ध संस्कृती मधील सारणाचे महत्त्व लक्षात येते, म्हणूनच तर सिद्धार्थाने येथे जन्म घेतला त्या लुंबिनी 1 क्रमांकाच्या पवित्र क्षेत्राचा दर्जा बौद्धजन देतात. तर बुद्धगयेत सर्व जगातील बौद्ध दुसरे धर्मक्षेत्र मानून तेथे मस्तक टेकवतात जेथे तथागताचा महापरिनिर्वाण प्राप्त झाले त्या कुशी नगरला चौथा धमक क्षेत्राचा ठिकाणी म्हणतात आणि तत्पूर्वी जेथे पहिले धम्मचक्र प्रवर्तन झाले त्या सारनाथला आपोआपच तृतीय धमक क्षेत्राचा दर्जा बहाल करण्यात येतो असे हे चार पवित्र तीर्थक्षेत्र बौद्ध धम्मात मान्यताप्राप्त झालेले आहेत ज्या दिवशी तथागतांनी या पंच वर्गीय भिक्षूंना धम्मदीक्षा देऊ प्रजीत दिवस होता सोमवार आषाढ पौर्णिमा 528 आणि त्या पंचस्वर्गीय विक्‍खूनची नावे होती. अश्वजीत, कश्‍यप, महानाम आणि भद्रिक या आषाढ पौर्णिमेस सर्व बौद्ध जनता धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने संबोधित. दिघडीकायानुसार वाराणसी हे कश्‍यप बुद्ध व भावी मैत्रेय बुद्धाची ही जन्मभूमी आहे. धम्मचक्रप्रवर्तन करतेवेळी तथागतांनी कथन केलेल्या मार्गाला विशुद्धी मार्ग असे पावनपथ म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात तो नमूद केलं आहे. भगवंतांनी यावे पंचशील आर्यअष्टांगिक मार्ग दहा पारमिता हा मानव मुक्तीचा मार्ग उपदेशिला पंचवर्गीय पवित्र धम्मा दीक्षा दिल्यानंतर पुढील महिन्याच्या येथील वर्षावास आत तथागताने वाराणसी येथील श्रेष्ठपुत्र यश व त्याच्या 54 मित्रांना धर्मोपदेश केला आणि त्यांना जनकल्याण करिता जन्मभर भ्रमण करण्याचा आदेश दिला. तर त्या वेळी तथागत बुद्ध असे म्हणतात की, हे विक्‍खूनो... "बहुजनाच्या हितासाठी व सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून तुम्ही सर्व बाहेर पडा मनुष्याच्या हितास बसू खास कारण ठरणारा हा धम्म उपदेश सुरुवातीस मध्य स्थितीत आणि अंतिम घटकेपर्यंत देखील कल्याणप्रद आहे.' 
जेथे भगवंतांनी या पंचवर्गीय भिख्खूंना दीक्षा दिली. त्या ठिकाणास पुढे 'धम्मेक स्तूप' या नावाने येथे वर्षावास साठी तथागत वास्तव्य करून होते. त्या ठिकाणास 'मुलगंधा कुटी' असे म्हणतात. सम्राट अशोक आपल्या राज्याभिषेकाच्या चोविसाव्या वर्षी गुप्त यांच्यासोबत येथे आला. व त्यांनी वर्गीयांना येथे उपदेश दिला गेला. तेथे एक भव्य स्तूप व त्यांच्या शेजारी एक विहार बांधला ज्या ठिकाणी भगवंत वर्षासाठी थांबले त्या जागेवरील मुलगंधा विहाराचे अवशेष आजही पहावयास सापडतात त्याच्या दक्षिणेस विशाल त्या स्तंभावर चतुर्मुखी सिंहमूर्ती बसवलेली होती त्या शीर्षावर एक चक्र सुद्धा कोरले होते. भारत सरकारने राष्ट्रीय चिन्हाचा रूपाने चार सिंह शीर्षस्वीकारले तर ध्वजाच्या मध्यभागी स्थान दिले आहे. ते धम्मचक्र अशोक चक्राला स्थान दिले सिंहशीर्ष सारनाथ येथील म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवण्याचे आजही पाहावयास मिळतात. 

चौथी घटना वर्षावास 

पावसाळ्यात कोणा एका विहारात राहून धर्मोपदेश करणे. यासच वर्षावास असे म्हणतात की कोणी धम्माची शिकवण देतात देतात भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होता. दोन भिक्‍खूंनी एकत्र न फिरता अलग अलग दिशेने धम्मप्रचार करावयाचा व एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक कधीच मुक्काम करायचा नाही. असा ही नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता. पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र कोणा एका मध्यवर्ती शहराच्या बुद्धविहारात भिकू ने मुक्काम करावयाचा व तेथे राहून धम्मदेसना करावयाचा प्रघात धम्मात आहे. पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे वर्षावास असे म्हणतात. भगवंतांनी पंचवर्गीय भिक्‍खूंना प्रथम धम्मदीक्षा 'सारनाथ' येथील मृगदाय वनत दिली. तो कालावधी पावसाळ्यातच होता. तेव्हा भगवंतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, तर त्याची सांगता अश्विन पौर्णिमेस होते. भगवंतांनी साजरा केलेला वर्षावाचा प्रथम दिवस होता."आषाढ पौर्णिमा" इ.स.पू. 528 त्यामुळे बौद्ध जनांमध्ये तथागतांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आणि त्यांचे विचार जीवनामध्ये अंगीकारणारे बौद्धजन आजही या आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दिवसांमध्ये त्यांच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात आणि पवित्र अशा या महिन्यांमध्ये चांगले विचार, चांगले आचार ,आपल्या परिवारात ,स्नेह जनात ,आणण्याचा प्रयत्न सदोदित करीत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com