रिसायकलिंग

मीना आंबेकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सगळे संपले असे वाटले की समजा, रिसायकलिंगची वेळ आली आहे !

छोट्या मृगांकच्या आवडीचा एक रंगीत काचेचा ग्लास त्याच्या हातातून पडून फुटला. तो ग्लास आता परत मिळणार नाही म्हणून तो अतिशय नाराज झाला. ग्लासचे तुकडे जोडून तो पुन्हा नवीन करता येईल का? नसेल, तर या तुकड्यांचे काय करायचे? त्याच्या मनात अशा अनेक शंका. मी म्हटले, "अरे, हे ग्लासचे तुकडे कारखान्यात जाऊन त्यापासून नवा ग्लास तयार होतो.' मग मृगांक मागेच लागला, "आजी, मला ग्लासचा कारखाना दाखव' म्हणून.

आम्ही एका काच कारखान्यात गेलो. अर्थातच त्याच्या लाडक्‍या ग्लासचे तुकडे बरोबर घेऊनच. तिथे काच रिसायकल सेंटर होते. एका भल्या मोठ्या भांड्यात काचेच्या बाटल्यांचे तुकडे, ग्लास व बरण्यांच्या काचा, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा अशा असंख्य प्रकारच्या काचा टाकलेल्या होत्या. त्यातच मग मृगांकच्या ग्लासचे तुकडेही तिथल्या सुपरवायझरने टाकले. निरनिराळ्या रंगांच्या काचा वेगवेगळ्या करून साफ केल्या गेल्या. एकाच रंगाच्या काचांचे तुकडे मोठ्या क्रशर मशिनमध्ये घातले. त्यात ठराविक प्रमाणात स्वच्छ वाळू, सोडा व कॅल्शिअम कार्बोनेट टाकून क्रशर मशिनमध्ये दळून त्याची पावडर केली गेली. हे पावडर स्वरूपातील मिश्रण एका भट्टीत आणले गेले व ते 2890 अंश फॅरनहाइट या प्रचंड तापमानापर्यंत तापवल्यावर ते वितळू लागले. ही पावडर पूर्ण वितळल्यावर ती वितळवलेली द्रवरूप काच विविध साच्यांमध्ये ओतली. हे साचे होते ग्लासांचे आणि बाटल्यांचे. साच्यात ओतलेली वितळलेली काच थंड झाल्यावर साच्यामधून बाहेर काढली, तर काय आश्‍चर्य ! नवीन ग्लास व बाटल्या तयार झाल्या होत्या. मृगांक आश्‍चर्यचकितच झाला होता.

तुटलेल्या-फुटलेल्या गोष्टीतून अतिशय कौशल्याने ईश्‍वर नवनिर्मिती करीत असतो.
ढग वितळल्यानंतर पाऊस पडतो. बिया फुटूनच त्यातून नवीन कोंब येतात. अंडे फुटून नवीन जीव जन्मतो. म्हणून जेव्हा "दिल टूट गया' असे वाटते, तेव्हा समजावे, की परमेश्‍वर एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी आपला उपयोग करून घेणार आहे. काचेसारखा नवीन करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meena aambekar write article in muktapeeth