अक्षरांचा सांकेतिक वापर

घनश्याम घोणे
Wednesday, 27 November 2019

अक्षरांचा सांकेतिक वापर करत त्या माध्यमातून वस्तूची विक्री करण्याची कला मला फार भावली. त्याचा आपणही वापर करण्याची इच्छा झाली.

अक्षरांचा सांकेतिक वापर करत त्या माध्यमातून वस्तूची विक्री करण्याची कला मला फार भावली. त्याचा आपणही वापर करण्याची इच्छा झाली.

ही कथा आहे एका बॅग विक्रेत्याची. या महाशयांची आणि माझी ओळख एका बॅंकेत मी परीक्षक (ऑडिटर) असतानाची. त्या बॅंकेच्या मॅनेजरची आणि प्रजापतीची खूप जुनी ओळख होती. सुरुवातीपासून मॅनेजर साहेबांनी त्याला वेळोवेळी कर्ज देऊन त्याचा धंदा, व्यवसाय वाढीसाठी मदत केल्यामुळे तो त्याचा मित्र आणि मार्गदर्शक झाला होता. आपल्या धंद्यातील चढउतार, आपली झालेली प्रगती आणि येणाऱ्या अडचणी तो मनमोकळेपणाने त्यांच्या समोर मांडत होता. मी त्रयस्थपणे पण उत्सुकतेने सर्व काही ऐकत होतो.

त्याच्या दुकानातील काही बॅगा तो इतर उत्पादकांकडून खरेदी करून आपल्या दुकानात विक्री करतो, तर काही बॅगा स्वतः तयार करून विकतो. त्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे रेक्‍झिनचे कापड, चेन, हॅंडल, त्यावर लागणारे लोगो, निरनिराळी रंगीत चित्रे, धागे, दोरे अशा वस्तू मुंबई आणि उल्हासनगरमधून ठोक विक्रेत्याकडून खरेदी करतो. पुण्याच्या एका उपनगरात त्याचा छोटासा कारखानाच होता. घरातील लोक आणि काही कामगारांच्या मदतीने तो बॅगा तयार करतो. त्याने तयार केलेल्या बॅगेच्या किमती म्हणजे कच्चा माल आणि मजुरी यांची नोंद तो ठेवतो. यावर विशिष्ट नफा ठरवून त्याची पण कमीत कमी विक्रीची किंमत ठरवितो. तर दुसऱ्या उत्पादकाकडून खरेदी करून विक्रीस ठेवलेल्या बॅगवर विशिष्ट नफा ठरवून त्याची विक्री करतो. हा माल खूप दिवस खपला नाही तर तो उत्पादक माल परत घेऊन जातो आणि नवीन माल त्याला देऊन जातो. या दोनही विक्रीच्या मालांची विक्रीची किंमत तो त्या मालावर सांकेतिक अक्षरात लिहून ठेवतो. प्रजापतीच्या हुशारीचे आणि सांकेतिक अंक म्हणून जो वापर केला त्याचे मला खूप अप्रूप वाटले आणि याचा वापर आपणास कोठे करता येईल का, याचा विचार करू लागलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by ghanshyam ghone