वापरा आणि फेका!

मृणालिनी भणगे
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

वस्तूंबद्दलची आत्मीयता संपत चालली आहे. वापरायचे अन् फेकायचे. आपल्या जवळच्या माणसांविषयीचाही आत्मीय भाव कमी होत चाललाय का?

समोरची षोडशा रीता नवीन सॅंडल्स घालून आली होती. नाजूक पट्ट्यांवर नाजूक सोनेरी डिझाईन असलेल्या सॅंडल्स छान दिसत होत्या, पण थोड्या नाजूक वाटल्या. मी म्हटले, ‘‘सॅंडल्स खूप छानच आहेत, पण जरा जपूनच वापरायला हव्यात. थोड्या नाजूक आहेत.’’
‘‘काय गं मावशी, पाच-सहाशेच्याच तर आहेत. मॅचिंग आहेत एका ड्रेसला. पाच-सहा महिने वापरल्या तरी पुरे. मॅचिंग जोड सहा-सात असतातच. तेवढ्यापुरते वापरायचे, मग फेकायचेच असतात.’’

मला जरा गंमतच वाटली. एक तर पाचशे-सहाशे रुपयांचे या पिढीला काहीच वाटत नाही. हल्ली ‘यूज अँड थ्रो’चा जमाना आहे. आपण वापरत असलेल्या कोणत्याच गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल यांना आत्मियता, थोडसे प्रेम काहीच वाटत नाही का? शाळा-कॉलेजात असताना जपून ठेवलेला माझा खजिना मला आठवला. एखादी आवडलेली पर्स, मैत्रिणीने दिलेले पेन, बहिणीने दिलेले ब्रेसलेट. किती बारीकसारीक वस्तू मी माझ्या खजिन्यात जपून ठेवल्या होत्या. त्या गोष्टीमागे प्रेम, जिव्हाळा लपलेला होता. आवडलेली वस्तू जपून प्रेमाने वापरली होती. मग ती कितीही छोटी असू दे. परवाच मी शाळेत नेत असलेला स्टीलचा कडीचा डबा पाहून माझ्या किती आठवणी जाग्या झाल्या होत्या. आणि आता रीता म्हणत होती, की ‘तेवढ्यापुरते वापरायचे, मग फेकून द्यायचे.’

मनात विचार आला, ही पिढी माणसांबद्दलही असाच विचार करीत असेल का? ‘गरज सरो, वैद्य मरो,’ या म्हणीप्रमाणे? आता काही कुटुंबं अशी दिसतात, की मुले लहान असेपर्यंत सून-मुलगा आईवडिलांसोबत एकत्र राहतात. पण मुले थोडी मोठी झाल्यावर त्या सगळ्यांना जागा पुरेनाशी होते. कपडे, वस्तू जशा ‘बोअर’ होतात, तशी आपली माणसेही ‘बोअर’ होतात का? बदलत्या काळानुसार ‘मॅचिंग’ होत नसतील आई-वडील की, त्यांच्यापासून दूर पळायचे? वस्तू, माणसे एकाच मापाने ‘यूज अँड थ्रो’ होतात का?
प्रश्‍न! प्रश्‍न! आणि प्रश्‍नच! प्रश्‍नांचा भुंगा डोके पोखरू लागला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mrunalini bhange

टॅग्स