मला भेटला विश्‍वेश्‍वर

सुमती पद्माकर पानसे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

काशीविश्वेश्वराचे दर्शन व्हावे असे मनात खूप होते, पण घाट चढताना दमले. बसले. तोच एका साधूने सोबत करत चालवले आणि सारे मनाजोगते झाले.

काशीविश्वेश्वराचे दर्शन व्हावे असे मनात खूप होते, पण घाट चढताना दमले. बसले. तोच एका साधूने सोबत करत चालवले आणि सारे मनाजोगते झाले.

आम्ही वाराणशीला गेलो होतो. संगमावरील घाट छान आहे. घाटावरील पायऱ्या चढून जाताना दमछाक होते. गल्लीबोळाचा साधारण एक किलोमीटर एवढा निसरडा रस्ता पार केल्यावर देऊळ आहे. घाट चढून गेल्यावर मी बसले. खूप दमायला झाले व देवळापर्यंत जायला जमेल की नाही असे वाटले. इतरांना देवळात जायला सांगितले. काही वेळाने मला हुशारी वाटली. माझ्याच वयाच्या बायका येताना दिसल्या. मला वाटले, त्या जाऊ शकतात, तर आपणही गेले पाहिजे. तेवढ्यात तेथून एक साधू जात होते. मला म्हणाले, ‘‘क्‍या मॉंजी, कहा जाने का है? तुम अकेली कैसी जाओगी?’’ ‘‘मुझे मंदिर जाना है।’’ ‘‘चलो, मैं तुझे मंदिर पहुंचाता हूं? लेकिन तुम्हारे लडके और रिश्‍तेदार वहॉं नहीं मिले तो? तुम खो जाओगी। तब तुम क्‍या करोगी?’’ ‘‘वहॉं मुझे सब मिल जायेंगे। मुझे पुरा विश्‍वास है।’’ मी त्या साधूबरोबर निघाले. मला हाताला धरून नेत होता. जाताना रस्ता अरुंद, ओला, निसरडा होता. मधूनच मी बसत होते. मला दम लागला की तो साधू माझ्या पाठीवरून हात फिरवत होता. जाताना त्या अरुंद बोळातून एका मागून एक मृतदेह येत होते. मी पुरती घाबरून गेले. मला वाटत होते की, इतकी माणसे एकदम कशी मेली? लक्षात आले, गंगेत मुक्ती मिळते, तेव्हा आसपासच्या गावातील असतील. एकदाचे मंदिर आले. मुख्य द्वारापाशीच माझे नातेवाईक भेटले. मला पाहून त्या सर्वांना आश्‍चर्य वाटले. साधू त्यांना म्हणाले, ‘‘मॉंजी को ऐसे छोडकर नहीं जाने का। उनकी अच्छी तरह देखभाल करो।’’

मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हारी मॉंजी और घरदार कहॉं है?’’ म्हणाले, ‘‘मैं सब छोडकर यहॉं पंद्रह सालसे आया हूँ। मैं शिवजीका भक्त हूँ। मेरा यहॉं आश्रम भी है।’’ श्री काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन मलाही घडले. मनात इच्छा असली की, प्रत्यक्ष काशी विश्‍वेश्‍वरच भेटला याची प्रचिती आली आणि मी भरून पावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sumti panase

टॅग्स