आनंदाचा ठेवा!

मृणालिनी कर्वे
गुरुवार, 13 जून 2019

नातवाबरोबर खेळताना वेळ अपुरा पडतो. पण परतावे लागतेच पुन्हा भेटीची वाट पाहात.

एके दिवशी फोन वाजतो. नातवाचे भरभर बोलणे चालू असते, ""आजी, नाऊ स्नो हॅज मेल्टेड अँड स्प्रिंग इज हिअर, बट यू आर स्टील नॉट विथ मी.''

नातवाबरोबर खेळताना वेळ अपुरा पडतो. पण परतावे लागतेच पुन्हा भेटीची वाट पाहात.

एके दिवशी फोन वाजतो. नातवाचे भरभर बोलणे चालू असते, ""आजी, नाऊ स्नो हॅज मेल्टेड अँड स्प्रिंग इज हिअर, बट यू आर स्टील नॉट विथ मी.''

अशी गोड तक्रार आल्यावर मनाची चलबिचल होतेच. पटापट कॅलेंडर काढून तारखा बघून कोणती कामे मागे टाकता येतील आणि कोणती केली नाही तर चालतील असे पाहात विमानाचे तिकीट काढले जाते. मी उत्साहात कामाला लागते. प्रत्यक्ष भेटल्यावर खात्री करून घेतली जाते, की इथून आम्ही कुठेही जाणार नाही ना! मग रोजची कामे चालू होतात. सकाळी शाळेत जाण्याची तयारी आई-बाबा पार पाडतात. शाळेतून आल्यावर गप्पा चालू होतात. आमच्या लहानपणी टीव्ही नव्हता. खेळणी, पुस्तके आम्ही मित्रमैत्रिणीत वाटून घ्यायचो याचे त्याला आश्‍चर्य वाटते. झोपताना गोष्टींचा रतीब असतो. पण मागच्या वर्षीच्या गोष्टी जुन्या होतात. नव्या बनवून सांगाव्या लागतात. आमचा कुत्रा आणि माझ्या शाळेतील एका खट्याळ मुलाची गोष्ट ऐकायचीच असते. ज्या दिवशी "स्कूल' नसेल तेव्हा आजीची परीक्षा घेतली जाते. डायनोसॉर, सुपरमॅन, बे-ब्लेड्‌स यांची माहिती नसलेली आजी नापासच होते. मग छोटे गुरुजी सांगतात, ""यू शुड लर्न न्यू थिंग्ज, आजी!''

मध्यंतरी घाईगडबडीच्या भारतभेटीवर स्वारी आली, तेव्हा त्याला माझी दिवसभराची धावपळ दिसत होती. मला म्हणाला, ""आजी, देअर इज नो वन टु हेल्प यू. आय विल टेल बाबा टु मेक अ रोबोट फॉर यू.'' मला इतका आनंद झाला, की चला, कोणीतरी आहे जगात माझी धावपळ पाहणारे! वाढदिवस येतो. केक कोणता आणायचा हे "ऑर्डर' देईपर्यंत बदलत राहते. त्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी आजी-आजोबा चांगल्या कपड्यात नातवाबरोबर शाळेत जातात. मग कॅलेंडर खुणावू लागते, की परतीसाठी एकच आठवडा राहिलाय. तो दिवस उजाडू नये असे वाटत असते. पण कशी तरी समजूत काढून, कोमेजलेला चेहरा आणि दोन टपोऱ्या डोळ्यांतील पाणी बघत निरोप घेणे, पुढच्या भेटीची वाट बघणे एवढेच माझ्या हाती राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by mrunalini karve