दोन बाटल्या

नीला कदम
शनिवार, 1 जून 2019

तिनं खुणेनं पाणी मागितलं. पंधरा-वीस सेकंदांत घटाघट पाणी प्यायलं. तृप्ततेचं लोभस हसू देऊन सिग्नल सुटायच्या आत ती डौलात फुटपाथच्या दिशेनं निघून गेली.

ग्रीष्मातली सकाळ! लायन्स संघटनेचे आम्ही काही सदस्य जेजुरीतील गुरुकुल शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तकं भेट द्यायला निघालो होतो. आमच्या क्‍लबची सेक्रेटरी श्रद्धा ऑन दे वे भेटणार होती. तिला घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून आम्ही निवांत होतो.

पलीकडे असणाऱ्या मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद, पाठीवर सॅक घेऊन प्रसन्न चेहऱ्यानं बहुधा पिकनिकला निघालेल्या मुलांचा ग्रुप, ताज्या-रसरशीत फळांच्या गाड्या, कडक पोषाखात ऑफिसला निघालेल्या बुद्धिजीवी वर्गाची वर्दळ आणि चांगल्या कामासाठी निघाल्याने आमच्या मनात असणारा उत्साह यामुळे हवेतील गरमाईचे आम्हाला काही वाटत नव्हते.

सहजच रस्त्याच्या बाजूला लक्ष गेलं अन्‌ दुधात मीठाचा खडा पडावा तसं वाटलं. तांबरलेल्या डोळ्यांचा एक माणूस झुलत-डोलत येत होता. बाजूला झाडापाशी तो थांबला. खिशातून एक चपटी बाटली काढून त्याने त्यातील मादक पेय काही सेकंदांत घटाघट पिऊन बाटली खाली टाकून दिली. झोकांड्या देत, तंद्रीत तो आमच्या गाडीजवळून गेला. नकोसा वाटणारा दर्प! छे! आम्ही वैतागलो. माझी मैत्रीण म्हणाली, "पोराबाळांच्या तोंडचा घास काढून नस्ती थेरं करायची...'

इतक्‍यात श्रद्धा आली. तिला घेऊन गाडी पुढं निघाली आणि सिग्नलला थांबली. नव्वद सेकंदांचा सिग्नल! हातात ताज्या टवटवीत फुलांचे गजरे घेऊन तितक्‍याच टवटवीत चेहऱ्याची एक पोरं गाडीपाशी गजरे विकायला आली. मोगऱ्याचा मोहक, भारून टाकणारा परिमल घेऊन आली. तिच्या डोळ्यातले निष्पाप, निरागस भाव पाहून तिला नाही म्हणताच आलं नाही. गजऱ्याचे पैसे देईपर्यंत तिचं लक्ष गाडीतल्या पाण्याच्या बाटलीकडे गेलं. तिनं खुणेनं पाणी मागितलं, श्रद्धानं पटकन एक बाटली तिला दिली. तिनं पंधरा-वीस सेकंदांत घटाघट पाणी प्यायलं. तृप्ततेचं लोभस हसू देऊन सिग्नल सुटायच्या आत ती डौलात फुटपाथच्या दिशेनं निघून गेली.
दोन बाटल्यांतल्या द्रवात फरक किती?
एक जीवघेणी मदिरा अन्‌ दुसरं जीवनदायी अमृत!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by neela kadam