दान रद्दीचे अमोल!

मानसी बापट
मंगळवार, 22 जानेवारी 2019

रद्दी म्हटले तर घरातील अडचण. वेळच्या वेळी निपटाराही करता येत नाही. मग साचत जाते; पण या रद्दीचे दान करता येते.

आपण अनेकदा आपल्या अवतीभवती, रस्त्यावर, अनाथाश्रमात हृदय पिळवटून जाईल अशी दृश्‍ये पाहतो आणि मग डोक्‍यात विचार येतो, की आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत. पण बघितलेली दृश्‍ये काही केल्या आपल्या विचारातून जात नाहीत. मग बरेच जण आपापल्या परीने जशी झेपेल, सुचेल तशी मदत करतात. मदत करायची इच्छा असते, पण कोणाला आणि काय मदत द्यायची असाही प्रश्‍न उभा राहू शकतो. मग कुणी ती मदत आपल्या घरी काम करणाऱ्या मावशींना असो, वॉचमनकाकांना असो अगर एखाद्या संस्थेला असो, करतात. 

मध्यंतरी आमच्या सोसायटीमध्ये ‘स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे’ उपाध्यक्ष एम. डी. देशपांडे आले होते. त्यांनी एका वेगळ्या दानाची कल्पना आम्हाला दिली. अन्नदान, गोदान, रक्तदान, देहदान इत्यादी दानांबद्दल ऐकून होते; पण त्यांनी आणखी एक दान यात जोडले, ते म्हणजे रद्दीदान. खरे तर घरात साठलेली रद्दी वेळच्या वेळी काढून टाकणे हे एक कामच होऊन जाते; पण येथे तर दुहेरी फायदा. घरातली रद्दीच दान करायची. महिन्यातून एक दिवस त्यांचे कार्यकर्ते येतात आणि तोवर जमा झालेली रद्दी घेऊन जातात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून दहावी झालेल्या गरजू मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या जातात. ही मदत त्यांना बसपास, महाविद्यालयाचे-वसतिगृहाचे शुल्क, खाणावळीचे पैसे, वह्या-पुस्तके यासाठी दिली जाते. ‘रद्दीतून शिक्षणास मदत’ हा प्रकल्प गेली आठ वर्षे सुरू आहे. अनेक सोसायट्यांमधे धूळ खात पडलेल्या सायकलीही दान स्वरूपात घेऊन त्यांची दुरुस्ती करून आदिवासी पाड्यांवरील गरजू मुला-मुलींना दिल्या जातात. त्या मुलांची रोजची पायपीट थांबते आणि तोच शाळेचा रस्ता त्यांना अधिक जवळचा वाटू लागतो. आपण गरजू मुलांपर्यंत थेट पोचू शकूच असे नाही; पण घरातल्या रद्दीच्या रूपात का होईना आपल्या मदतीचा हात त्या मुलांपर्यंत पोचू शकेल. रद्दीचे मोल खूप आहे, असे मला तरी वाटू लागले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Mansi Bapat