शुभमंगल एकदाच!

मिलिंद वा. गाडगीळ
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सेलिब्रिटींनी कोणत्याही वयात लग्न केले तरी आपण केवळ बातम्या वाचायच्या. तसा काही विचारही मनात आला तरी...

एका सेलिब्रिटीने वयाच्या बावन्नाव्या वर्षी आपल्यापेक्षा पंचवीस वर्षांनी लहान असणाऱ्या मैत्रिणीबरोबर लग्न केले. कसे काय जमते बुवा यांना. आपल्यासारख्या अनेकांच्या असं काही मनात आलं तरी आपण भीमरूपी महारुद्रा म्हणायला लागतो! आणि या सेलिब्रिटीचे हे तिसरे लग्न होते, हे वर जखमेवर मिठाचे पोते असल्यासारखे. ते सेलिब्रिटी आणि आमच्यात वयाचे साम्य आहे. ते मॅरेथॉनमध्ये धावतात, तर आम्ही जगण्याच्या शर्यतीत.

आम्ही असे धाडस करायचा विचार जरी केला तरी काय होईल! अख्खे कुटुंब भूकंपग्रस्त दिसेल. बायको सायलेंट मोडवर, डबल सिमकार्डसारखी असणारी दोन मुले हॅंडसेटमधून बाहेर जातील, नातेवाईक डेटा हॅंग व्हावा तसे होतील आणि आम्ही स्वतः कव्हेरज क्षेत्राच्या बाहेर! ‘शोभते का या वयात?’ या वाक्‍याचे बाण असंख्य ठिकाणांहून येतील. ‘मी पहिल्यापासूनच हिला म्हणत होतो, या माणसाचे काही खरे नाही,’ हे वाक्‍य म्हणायचे स्वातंत्र्य कुणीही घेईल. ही बातमी मी नुसती घरी मोठ्यांदा वाचली, तरी पत्नी उद्यापासून वर्तमानपत्र बंद करून टाकेल आणि वर मला, ‘हे वय परिपक्व विचार करून निर्णय घेण्याचे असते,’ हे सुनावेल. 

एकच लग्न केले तरी ते टिकावे म्हणून आपण सारे किती वेळा पडते घेतो, तडजोड करतो; पण हा विषय प्रसिद्ध व्यक्तींनी किती सोपा करून ठेवलेला आहे, याचे कौतुकमिश्रित दुःख वाटते. या वयात नव्याने लग्न करूयात का, हा विचार मनात येताच आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींची कार्यं जवळ येऊन ठेपल्याची जाणीव होते. आमच्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली तरी आजही माझे सासरे ‘माझी मुलगी तुम्हाला देऊन तुमच्यावर अनंत उपकार केले आहेत’, या थाटात माझ्याकडे बघत असतात. त्यामुळे नव्या छोकरीचा विचारही मनात येऊ शकत नाही. त्याउलट नोकरी सहा वर्षेच राहिली, या विचारांनी मन चिंताक्रांत होऊन जाते. त्यामुळे नव्याने आता कुठे जीव जडवायचा? उगीच जीवावर बेतायचे!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Milind Gadgil

टॅग्स