esakal | हम तो हैं परदेस में ।
sakal

बोलून बातमी शोधा

jagjit

जगजीत सिंह जेव्हा फिल्मी गाण्यांप्रमाणे गझल गायला लागले, तेव्हा सर्वसामान्य रसिकांनी गझलमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. आणि गझल जाणकारांच्या भुवया उंचावल्यात. विशेषतः गझलच्या साम्राज्यात बेगम अख्तर, कुंदनलाल सहगल, तलत मेहमूद, मेहंदी हसन यांची हुकूमत होती.

हम तो हैं परदेस में ।

sakal_logo
By
मंगेश गोमासे

गझलचे बादशहा जगजितसिंह यांना जाऊन तब्बल दहा वर्षे झालीत. मात्र, तरुणांच्या मनात त्यांच्या गझल चिरंतन आहेत. अगदी आजही कॉलेजगोइंग तरुणांनी ' होश वालो को खबर क्या... बेखुदी क्या चीज हैं' ही गझल ऐकली की त्यांचं मन खुलून उठतं. या तरुण मनाच्या गजल गायकाने अनेक दशके जनतेच्या मनावर राज्य केलं.

खर तर जगजीत सिंह चित्रपट जगतात पार्श्वगायक होण्याचे स्वप्न मनात घेऊन आले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक पार्ट्या आणि कॉलेजमध्ये गाणे म्हणावे लागले. त्यांच्याच गजल प्रमाणे 'चाक जिगर के सी लेते हैं, जैसे भी हो जी लेते हैं। ' अशा परिस्थितीत त्यांनी बरेच दिवस काढले. त्यावेळी `एचएमव्ही‘ला लाईट क्लासिकल ट्रेंडनुसार संगीताची आवश्यकता होती. १९७६ साली विमोचित झालेल्या जगजीत सिंह यांच्या 'द अंफॉरगेटेबल्स' या पहिल्या अल्बममधून ती पूर्ण झाली. हा अल्बम बराच हिट झाला.

जगजीत सिंह जेव्हा फिल्मी गाण्यांप्रमाणे गझल गायला लागले, तेव्हा सर्वसामान्य रसिकांनी गझलमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. आणि गझल जाणकारांच्या भुवया उंचावल्यात. विशेषतः गझलच्या साम्राज्यात बेगम अख्तर, कुंदनलाल सहगल, तलत मेहमूद, मेहंदी हसन यांची हुकूमत होती. याशिवाय जगजितसिंह यांची शैली शुद्धतावादीयांना रास आली नाही.

तरीही आपल्या सुमधुर आवाजाच्या जादूने त्यांनी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविले. खासकरून 'अर्थ' या चित्रपटातील 'कोई ये कैसे बताये वो तन्हा क्यूं है ।', ' झुकी झुकी सी नजर', तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' , यानंतर 'साथ साथ' चित्रपटातील 'तुमको देखा तो... ये खयाल आया', या गझलने जगजीत सिंह यांना प्रसिद्धीच्या उंचीवर नेले.


जमाना बदलला आणि तरुणांची आवड बदलली. चित्रपट गीतांऐवजी तरुणाई गझलकडे वळली. या दौर मध्येही जगजीत सिंह यांनी तरुणाईला आपल्या आवाजाच्या जादूने वेड लावले. 'सेहर', 'लव्ह इज ब्लाइंड', 'मरासिम' यासारख्या गझल अल्बम ने त्यांनी तरुणाईच्या मनात कायमचे घर केले. 'तुम बिन' मधील 'कोई फरीयाद' असो की 'बडी नाजूक हैं ये मंजिल मोहब्बत का सफर है।' या गझल आजही तितक्याच तरुण वाटतात.

१० ऑक्टोबर २०११ साली ब्रेनहॅमरेजने जगजीत सिंह यांचे निधन झाले. मन सुन्न झाले अन् एकच गझल मनात आली 'चिठ्ठी ना कोई संदेस जाने वो कोनसा देस.. जहा तुम चले गये। अब यादों के साये इस दिल मे चुभते हैं। ना दर्द संभलता हैं ना आसू रुकते हैं। अशीच मनाची अवस्था झाली. आज दहा वर्षांनंतरही आपल्या आवाजाच्या रुपात जगजीत सिंह जिवंत असून खरचं म्हणत असतील ' हम तो हैं परदेस में, देस में निकला होगा चॉंद'