esakal | मुळांचा शोध घेताना डोळस दृष्टी आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

khagolshastra


खगोल विज्ञानाच्या संदर्भात काही विदेशी संशोधकांची मते बघण्यासारखी आहेत. भारतीय खगोलशास्त्रासाबंधी एक महत्वपूर्ण लेख प्रसिद्ध विद्वान जॉन प्लेफेर याने लिहिलेला आहे. भारतीयांची या शास्त्राविषयीची माहिती थक्क करणारी आहे आणि किमान १५०० वर्षे आधीपासून त्यांना हे ज्ञान अवगत असल्याचे तो त्यात नमूद करतो.

मुळांचा शोध घेताना डोळस दृष्टी आवश्यक

sakal_logo
By
प्रशांत आर्वे चंद्रपूर

मागील लेखात आपण डाव्या आणि उजव्या या दोन्ही आधुनिक काळातील पश्चिमेच्या विचाराशिवाय भारताचा मूळ विचार काय होता असा प्रश्न उपस्थित केला होता. तो शोधायचा तर ब्रिटीशपूर्व भारताकडे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हेही बघितले.त्यात आमच्या विज्ञान विषयक धारणा,त्यातील संशोधन आणि प्रत्यक्ष उपयोग हा वाराणशीच्या खगोल संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण बघितला.

खगोल विज्ञानाच्या संदर्भात काही विदेशी संशोधकांची मते बघण्यासारखी आहेत. भारतीय खगोलशास्त्रासाबंधी एक महत्वपूर्ण लेख प्रसिद्ध विद्वान जॉन प्लेफेर याने लिहिलेला आहे. भारतीयांची या शास्त्राविषयीची माहिती थक्क करणारी आहे आणि किमान १५०० वर्षे आधीपासून त्यांना हे ज्ञान अवगत असल्याचे तो त्यात नमूद करतो.

त्यावेळचे फ्रेंच खगोलतज्ञ श्री. जेंटील हे १७६९ मधे भारतात शुक्राचे निरीक्षण करण्याकरिता आले होते.सयाम मधून आलेली खगोलीय कोष्टके तेंव्हा प्यारीस ला पाठविण्यात आली होती. श्री जेंटील यांनी येथे खगोलशास्त्राचे सखोल अध्ययन सुरु केले. येथील विद्वान मंडळींनी त्यांना याकामी बरीच मदत केली. त्यांच्या अभ्यासावर आधारीत लेख सायन्स अकादमी या स्मरणिकेत छापुन आला होता. प्लेफेर पुढे असेही सांगतो की भारतीय लोक ज्या सूत्रांचा वा ज्ञानाचा वापर करून भविष्यात होणारी ग्रहणे आणि ग्रहांबद्दलची माहिती सांगतात ती कोणत्या सिद्धांताने सिद्ध केली आहेत हे त्याला सांगत येत नाही. त्याची उत्तरे अचूक असली तरी त्याला त्या मागील विज्ञान माहिती नाही. या खगोलशास्त्रात प्रामूख्याने तीन गोष्टीवर भर दिलेला आपल्याला दिसतो.

१ ) सूर्य ,चंद्र यांची स्थाने निश्चित करणारी कोष्टके व नियम
२) ग्रहांची स्थाने निश्चित करणारी कोष्टके व नियम
३) ग्रहणाचा स्पर्श, पूर्ण स्थिती, आणि शेवट निश्चित करण्याचा नियम

सुप्रसिद्ध ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टोलेमीने केलेली ताऱ्यांच्या गतीच्या गणने पेक्षा भारतीय कोष्टकामधील गणना अधिक सरस असल्याचे तो सांगतो. कालगणनेची जी विविध कोष्टके सापडली त्यात त्रीवेलोरची कोष्टके सर्वात प्राचीन आणि अचूक आहेत. या कोष्टकांच्या आधारे चंद्र आणि सूर्याची नेमकी स्थिती आणि अंतर हे विद्वान काढत असल्याचे प्लेफेर नमूद करतो. विशेष म्हणजे ही कोष्टके १७५० च्या काळात युरोपातील अनेक विद्वानापर्यंत पोचली होती. त्रीवेलुरच्या सारणीत दिलेल्या ग्रह ताऱ्यांच्या संपाताच्या जागा, सौरवर्षाची लांबी,गुरु आणि शनी यांच्या कक्षा ही सारी निरीक्षणे युरोपातील शास्त्रज्ञांच्या तोडीची आहे,किंबहुना त्यात बरेच साम्य आहे.

हीच बाब हेलेन सेलीन यांच्या Non western science and Technology या बाबत सांगता येईल. हेलेन सेलीन यांनी भारतीय तंत्रज्ञानाची दाखल घेतली आहे. विज्ञान ही भारतासाठी त्याकाळी आयात करणारी गोष्ट नव्हती हे जरी खरे असले तरी. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आमची वैज्ञानिक प्रगती आम्हाला तपासून बघावी लागते. एस-४०० आणि राफेल साठी जर आमच्या संरक्षण मंत्र्यांना फ्रांस आणि रशियाच्या भेटी घ्याव्या लागत असतील तर आमचा तो वारसा गेला कुठे हा प्रश्न स्वाभाविकपणे उत्पन्न होतो. या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शोधावे लागते.

एकवार आपण वैज्ञानिक संशोधनाच्या बाबत आपले अकर्मण्य मान्य करू पण आपली महसूल व्यवस्था, शिक्षण, निषेधाच्या पद्धती याचा विचार मात्र भारतीय पद्धतीने पुन्हा एकवार अभ्यासाची गरज आहे. समाजशास्त्र, इतिहास या विषयाच्या अभ्यासकांनी या आम्च्य्क़ प्राचीन पद्धतीचे पुरुज्जीवन होण्याच्या अंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आज कराच्या नावाखाली सामान्य माणसाची जी लूट होते त्यामागे राजसत्तेकडून होणारे शोषण आहे. मात्र याबाबत ब्रीटीशपूर्व भारतीय व्यवस्था अधिक सक्षम आणि डोळस होती. अन्याय्य कायद्याचा निषेध करण्याची अभिनव पद्धती या देशाने निर्माण केली. पुधेद त्यालाच सविनय कायदेभंग म्हटल्या गेले. निषेधाची ही अस्सल पद्धत होती. याचे पुनरुज्जीवन आम्हाला करता येऊ शकते. झुंडशाही करून सरकारला झुकण्यास बाध्य करणाऱ्या समाजाला आपल्याच व्यवहाराचे वावडे आहे.

आमच्या मुळांचा शोध घेताना डोळस दृष्टी आवशक आहे. अन्यथा इतिहासात रमणारे हा जो आमच्या समाजाचा असलेला दोष आहे. त्यापासून आपली मुक्तता नाहीच.मुळांचा शोध घेऊन त्याची प्रासंगिकता तपासावी लागेल तरच त्याला काही अर्थ आहे.


 

loading image