परंपरांचे नूतनीकरण

स्वाती दाढे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

समाजात बदल घडतच असतात. विचार प्रक्रिया सुरू असते. समाजात सामंजस्य वाढते.

नुकतीच एका लग्नाला गेले होते. वराचे वडील हयात नव्हते. मला वाटले, त्याचे काका-काकू लग्नविधी करतील. पण जे पाहिले, त्याने सुखद धक्का दिला. सर्व लग्नविधी वरमाईच्या हस्तेच झाले. मुलाचाच तसा हट्ट होता. त्यासाठी त्याने आईचे मन तयार केले आणि गुरुजींशी चर्चा करून त्यांचीही मान्यता घेतली. लग्न या महत्त्वाच्या संस्कार-विधीत त्याने आईचा उचित गौरव केला आणि याचे स्वागत करणारी चर्चा हॉलमध्ये झाली, हे विशेष. समाजात बदल घडतच असतात.

शिक्षणामुळे विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. काय योग्य, काय अयोग्य, काय फायदेशीर, कुठे बदल करता येईल, काय शाश्वत आहे यावर विचारविनिमय होतो. निर्णय घेतले जातात, ते अमलात आणण्याचे प्रयत्न होऊ लागतात. या सर्वांमुळे मनाची खोलवर मशागत होते. समाजात ज्ञान, सामंजस्य, आत्मविश्वास वाढतो.
आम्ही मुलीच्या लग्नात अक्षता "फेकण्या'ला स्थगिती दिली. मंचावर तबकात अक्षता ठेवल्या. स्नेहीजनांनी मंचावर येऊन वधू-वरांच्या डोक्‍यावर अक्षता ठेवल्या आणि त्यांना आशीर्वाद दिले. यामुळे दोन-चार किलो तांदूळ पायदळी तुडवण्यातून वाचले. त्यात अजून तेवढ्याच तांदळाची भर घालून ते एका अनाथालयात पोचते केले. आज अनेक प्रथा, रूढी, परंपरा कालबाह्य झाल्या आहेत. बायकांचे उपास, व्रते, सण, तसेच अंधश्रद्धा यांबाबत विचारमंथन चालू आहे. त्यांवर प्रबोधन, अंमलबजावणी होत आहे. अशावेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील बारीकशी सीमारेषा लक्षात घ्यायला हवी. आज खाणेपिणे, राहणीमान, कामधाम, लग्न, अपत्ये आदी बाबींमध्ये स्थित्यंतरे होत आहेत आणि हे कालसापेक्ष, सुसंगतच आहे. आपल्या थोर समाजसुधारक, विचारवंत अशा पूर्वजांचे समाज सुधारणेचे विचार प्रत्यक्षात आणणे, ही आपलीच गरज आहे, आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्‍यकच आहे.
चला, चांगल्या प्रकारे बदल करूया!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swati dadhe write article in muktapeeth