अन् पिल्लांच्या पंखात बळ आलं....

muktapeeth
muktapeeth

जाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती. उडताना जीवनाचा संदेश देत होती. आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते विचार मात्र सकारात्मक पाहिजे. चिमुकल्या पिल्लांच्या पंखात बळ आल होत. माझ्या सभोताली फिरत त्यांनी एक गिरकी घेतली अन् कधी नाहीसे झाले कळच नाही.

रात्रीची वेळ होती, घरासमोरील जाई फुलली होती. कार्यक्रम आटोपून मी लगबगीने घरी परतलो होतो. जाईचा सुंगध सगळीकडे दरवळत होता. मला मात्र रात्रीच्या वेळी जाईवर पक्ष्याचा आवाज येत होता. पण मला घरी येण्यास उशीर झाल्याने घरात जावे लागले. जेवन करून पुन्हा शतपावली करताना दरवाजात पक्षाचा आवाज येतच होता. पण तरीही मी दुर्लक्ष केलं. दिवसभरातील कार्यक्रमांच्या तणावामुळे लवकरच झोपलो. पण त्या पक्षाचा किलबिलाट माझ्या चांगलाच लक्षात राहिला. दमल्यामुळे चांगलीच झोप लागली होती. तशी माझी सकाळ ही चार वाजता सुरू होते. व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो तरी दरवाज्यातील वेली वर पक्षांचा आवाज येतच होता. पण आज जरा अस्वस्थच होतो. कारण काहीतरी मला जाणीव करून देत असल्याचा संकेत निसर्गाने दिल्याचे दिसून येत होते. व्यायाम करून आल्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण जाईच्या झाडावर पडली होती. जाईच्या झाडावर फुलांची बहर पडली होती. घरासमोर देखील फुलांनी रांगोळी काढली होती. सगळीकडे सुंगध दरवळत होता. त्यामुळे सकाळच्या वेळचा तो प्रसंग अगदी सुंगधीत व प्रभावी दिसून येत होता.

मी, आल्यावर या वातावरणात मला त्या वेलीवर पक्षी मोठ्या उत्साहात खेळताना दिसले. दोन पक्षी काळ्या रंगाचे निळ्या चोचीचे पक्षी अगदी मनमुराद नांदत होते. त्यांच्यात कितीतरी मोठा समन्वय होता. संसारात अगदी जोडीदार शोभावा अन् त्याला आपलस करून घ्यावं या पलीकडच त्यांच प्रेम होतं. एकानं चोचीत काडी आणली तर दुसरा चोचीत गवत आणत होता. कोणी पाहू नये म्हणून वेगळ्या आवाजाच्या संकेतात ते बोलत होते. आपला जोडीदार आपल्याला साथ देतोय, त्यासाठी त्यांची ती प्रांपचीक स्थिती काहीतरी आगळी वेगळी होती. मी मात्र माझ्या घरासमोर असल्याने या निसर्गाच्या अनमोल स्थितीला फक्त पहात होतो. येणारे जाणारे या वेलीला कशाला लावली अस म्हणत हिनवत होते. उगच रात्रीच्या वेळी माणसाला ताप असच बोलत होती.

काळ गेला तस ते घरट देखील बनू लागले. त्या घरट्याला या पक्षांनी आकार दिला असल्याने माझ्या वेलीवरच घरट मला देखील मोहक वाटू लागलं. दोन्ही पक्षी आपल्या दिवसभरचा प्रवास करत या घरट्यात संध्याकाळी बिनदास्त राहत होते. रात्रीच्या वेळी कोणी आल तर जरा जपून चला बर का अस म्हणत माझ्याकडे पाहुणे आल्याच नक्की मी आर्वजून सांगत होतो. त्यावेळी मात्र जाई फुलल्याच सांगत सुंगधी वाऱ्याची किमया जवळपासचे बोलत असत.

मी मात्र या पक्षांच्या घरट्याकडे नेहमी दक्ष भुमीकेने पाहिले. सकाळी उठून चारा टाकण्यासाठी तांदूळ टाकायचा. पाण्याचा तर एक आगळा वेगळा पाणवठा त्यांच्यासाठी केला होता. काही दिवसात या घरट्यात अंडी दिसून आली. पण याला संरक्षण म्हणून मी देखील त्या वेलीची काळजी घेऊ लागलो. काही दिसवातूनच या अंड्यातून चिमुकली पिल्ले बाहेर पडली. त्यांचा रंग आता पांढरा होता. हे दोन्ही पक्षी आता त्या पिल्लांची काळजी घेत होते. त्यांना हवे असणार खाद्य त्यांना आणून देत होते. त्यंना हवे असणर पाणी ते देत होते. त्यांना उन वारा पाऊस या पासून बचाव करण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा महत्वाचा होता. आपलं पिल्लू घरट्या बाहेर पडू नये यासाठी त्यांनी केलेली कसरत महत्वाची होती.

मी, दररोज या पक्षांना पाणी खाद्य देऊनच सकाळची सुरूवात करू लागलो होतो. त्यामुळे मला ही सकाळ अगदी जीवनातील अस्थीत्व निर्माण करून देणारी ठरली. या काळात मी माझ्या कुटूंबाला आयुष्याचे धडे कसे असतात असे ही शिकवले. पण त्या दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण जाईच्या वेलीवर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी त्या पिल्लांचा रंग देखील त्या पक्षांसारखा झाला होता. निसर्गात शोभून रहावं  तसा त्यांचा रंगा तयार झाला होता. ते मात्र उडताना जीवनाचा संदेश देत होती. आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते, विचार मात्र सकारात्मक पाहिजे. चिमुकल्या पिल्लांच्या पंखात बळ आल होत. माझ्या गाडी भोवताली या सगळ्या पक्षांनी एक गिरकी घेतली अन् कधी नाहीसे झाले कळलच नाही. माझ्या कुटूंबातील सगळेजण हा आनंदाचा क्षण पहात होते. पण माझ्या आयुष्यात असेच घडेन हे देखील मला कधीच वाटले नाही. पिल्ल्यांच्या पंखात बळ येत अन् ते उडू लागतात. आपल सगळ मागच आयुष्य विसरून लपवतात ती आपल अस्थीत्व. करतात नवीन जीवनाची सुरूवात हे अगदी सत्य आहे. कोणाच्याही आधारावीना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com