जीवनात आधार महत्वाचा...

yunus tamboli
yunus tamboli

जीवन हे क्षणभंगूर पाण्यावर येणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे आहे. आयुष्यात कोणाचा तरी आधार महत्वाचा असतो. पतीला पत्नीचा, भावाला बहिनीचा मग त्यात मुलांना आईचा. ही सहज समजणारी गोष्ट आहे. कुटूंबात जे सहजतेने मिळते त्याचे मोल राहत नाही. कौटोंबीक आधार देणारा जीवनातून निघून गेल्यावर मात्र या सगळ्या गोष्टीं समजू लागतात. जबाबदारी पडली की मगच कळत की आपल्या जीवनात कोणाचा तरी आधार हा महत्वाचा असतो. त्यावेळी मात्र बराच काळ वेळ निघून जातो.

दुपारची वेळ होती अन मी सहज एका वृद्धाश्रमाकडे गाडी ओळवली. ओळखीचे काका माझी तर वाटच पहात होते. काय काका... कशी काय म्हणते तब्येत, असा सहज प्रश्न मी त्यांना केला. काकां च आपला नेहमीचच.. चेहऱ्यावर खोट हसरपण आणत सुरूकत्या पडलेल्या चेहऱ्यावर समाधान दाखवायच. काय नाय जेवनाची वेळ झालीया जेवावे लागेल. अस म्हणत चला जेऊ सोबत असे ते म्हणाले. लग्न झाल्यावर वयाच्या अंशी पर्यंत तीन मला सोडून कधी खाल्लच नाही. मला उशीर झाला ना दारावर वाट पहात बसायची. अरे एकदा काय झाल... मित्रांनी अचानक पार्टी दिली. तिला काहि घरी कळवल नाही. त्या काळात काय मोबाईल होते व्हय. आम्ही मात्र जाम जेवून घरी गेलो. घरी आल्यावर दारावर वाट पाहणारी तुझी काकू मात्र त्या दिवशी जाम माझ्यावर भडकली. माणसान किती ही जीव लावा. पण आपल कोण हाय का. असे म्हणत त्या दिवशी ती जेवली सुद्धा नाही. मग काय आम्हाला देखील दोन दिवस उपवास घडला. तो तर किस्सा आगळा वेगळाच आहे. काकू गेल्यावर जीवनातील किस्से काकांनी जपून ठेवलेले होते. जीवन साथीच्या आठवणी जपत काकू गेल्यानंतर काका माझ्याशी शेअर करायचे. पत्नीचा आधार गेल्यावर एकाकी जीवन होत त्याच जे ज्वलंत उदाहरण होत. काका सोबत जाता जाता मला तर आश्चर्याचा धक्का बसला. पाहतो तर माझ्या ओळखीची एक वृद्ध महिला नव्यानेच या वृद्धाश्रमात दाखल झाली होती. मुल कमवती असली तरी तिच्याकडे पहायला कोणाला वेळ नव्हता. या वयात तिला कुटूंबाचा खरा आधार मिळण्याची गरज होती. पण पती गेल्यावर एकाकी पडलेली ही महिला आता वृद्धाश्रमात दाखल झाली होती. वृद्धाश्रम तिच काळजी घेणारच पण तरीही जीवनात खरा आधार पती निघून गेल्यावर काय अनुभव येतो ते. मला समोर दिसत होत.

काका आता जेवन आटोपून माझ्याजवळ आले होते. काय सौफ तर खाणार की नाही असे म्हणत त्यांनी माझ्या हातावर चिमुटभर सौफ ठेवून खर्चीत विराजमान झाले. एकडच्या तिकडच्या गप्पा मारत. मी दिर्घ स्वरात काका शी बोलू लागलो. काका...बहिनच देहावसन झाल. खूप आजारी होती ती. माझ्यापेक्षा वयान लहान होती. मुल आता मोठी समजूत दार आहेत. आजारात मला एकच मागितल. माझ्या मुलीच लग्न माझ्या डोळ्यासमोर लावून दे. मागच्या आठवड्यातच तिच्या डोळ्यासमोर मुलीच लग्न लावून दिल. हिरव्या ड्रेस अन हिरव्या बांगड्या घालून तिला वरमाई केल. हसत खेळत सगळ काही करत होतो. पण बहिनीची अवस्था पाहून तिच्या समोर रडू पण लपवत काहि काळ गप्पा अन हसण्यातही घालवल्या. चार पाहुणेरावळे जेऊ घातले. जावाई चांगल मिळाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होत. एवढ्या आजारात असताना मुलीच्या लग्नात काय काय करायच सगळ सांगत समाधान व्यक्त करत होती. लग्न पार पडल, अन मला म्हणाली. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली. आता मला कशाची चिंता नाही. जबाबदारी पडल्यावर मुल आपोआपच शहाणी होतील. तुम्ही आता गेल तरी चालेल. दोन दिवसापुर्वी तिच निधन झाल. मुलांचा केवीलवाणी चेहरा अन कौटोंबिक होणारी अवस्था हे सगळ भविष्य डोळ्यासमोर दिसत आहे.

काकाने देखील सगळ ऐकून घेऊन दिर्घ श्वास टाकला. चांगल केलस म्हणत माझ्या पाठिवरून हात फिरवला. जबाबदारीच ओझ पडल्यावर या समाजात आपोआपच माणूस चालतो. जो पर्यंत आधार असतो ना तो पर्यंत त्याच मोल नसत रे बाळा. बहिनीचा आर्शीवादाचा आधार होता मला. असे मी सहजतेने म्हटलो. त्यावर काका बोलू लागले. हे पहा आता त्या मुलांना देखील आईचा आधार महत्वाचा होता. पण पिल्लांना पंखात बळ येई पर्यंतच खरा आधार असतो. त्यानंतर त्यांनी समाजात वावरायला शिकल पाहिजे. आपल्या जीवनाचा आधार निर्माण करायला पाहिजे. तूझा तरी आधार किती वेळ राहणार. अन तू जरी आधार दिला तर ते पुन्हा पांगळे होतील. त्यांचा खरा आधार उभा करण्यास कुचकामी ठरतील. मी पण काकांचे बोलण्याचा अर्थ समजलो होतो. तरी पण जीवनात कोणाचा तरी आधार असणे गरजेचे असते. या विषयावर मी ठामच होतो. बहिनीचा अंतविधी डोळ्यासमोर फिरत होता. ओले झालेले डोळे रूमालाने पुसत. काही वेळ दोघे ही निशब्द बसून अस्ताला गेलेला सुर्य पहात होतो. काका... आता संध्या काळ झाली म्हणत मी देखील तेथून जड अंतकर्णाने निघून घरी आलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com