esakal | कोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार?
sakal

बोलून बातमी शोधा

कोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार?

कोरोनाच्या या नव्या रूपाचा तरूणांना जास्त धोका असल्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोविडच्या नव्या रुपाचा तरुणांना जास्त धोका असणार?

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: कोरोनाने विषाणूने बदललेल्या रुपामुळे ब्रिटनमध्ये  व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या या नव्या रूपाचा तरूणांना जास्त धोका असल्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारने या व्हायरसबाबत धोक्याची सूचना दिली असून मागच्या एका महिन्यात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांच्या तपासणीवर लक्ष दिले  जाणार आहे. भारतासह इतर 40 देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत.

नीती आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोरोना व्हायरसचे नवे रूप खूप संक्रामक असून वेगाने पसरत आहे. युरोपीय सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस तरूणांना जास्त प्रमाणात प्रभावित करू शकतो. वैज्ञानिकांनी या नवीन व्हायरसच्या स्ट्रेनचे नाव बी.1.1.7. असं ठेवलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान पॉल यांनी सांगितले की, ''भारतात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. आतापर्यंत उपलब्ध असलेले आकडे, विश्लेषण यांच्या आधारावर या नवीन व्हायरसला घाबरण्याची आवश्यकता नाही असं दिसून येत आहे. पण तरिही आधीपेक्षा जास्त सावधगिरी आता बाळगावी लागणार आहे. ''

हेही वाचा- मोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

''व्हायरसच्या नवीन रूपात झालेला बदल लक्षात घेता कोरोनाच्या गाईडलाईन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खासकरून ज्या देशात लसीकणाला सुरूवात झाली आहे. त्या देशात या व्हायरसच्या स्ट्रेनचा काहीही परिणाम होणार नाही असा अंदाज लावला जात आहे.'' असे ही त्यांनी पुढे सांगितले आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

This new form of corona is thought pose a greater risk young people