एकशे एक रुपयांत इको फ्रेंडली बाप्पा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 August 2017

ठाणे - गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने चढ्या भावातील मूर्तींच्या खरेदीपेक्षा अवघ्या एकशे एक रुपयांत बाप्पाचे देखणे रूप गणेशभक्तांना मिळणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींकडे वळणाऱ्या भक्तांना पर्यावरणपूरक उत्सवाचा नवा धडा देण्यासाठी "एकशे एक रुपयांत इको फ्रेंडली बाप्पा' हा उपक्रम खेवरा सर्कल येथे सुरू झाला आहे. गणेशोत्सवाची तयारी अवघ्या शेवटच्या टप्प्यात आली असताना, घरगुती गणेशमूर्तीच्या शोधात असलेल्या भाविकांसाठी ठाण्यात हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

वाढत्या महागाईमुळे हवालदिल झालेल्या भाविकांना गणेशोत्सवादरम्यान खरेदीतही महागाईचा सामना करावा लागतो. गणपती बाप्पांच्या मूर्तीही कमालीच्या महागल्या असून, शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती स्वस्त असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. या मूर्ती विसर्जनामुळे शहरातील जलस्त्रोत प्रदूषित होत असते. त्यामुळे शाडूच्या मूर्ती स्वस्त दरात नागरिकांना देणारा प्रयोग ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. अवघ्या 101 रुपयांमध्ये भाविकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरी घेऊन जाता येणार आहे. मूर्ती घडवणाऱ्या कार्यशाळा, शाळा आणि महाविद्यालयांतून होणारी जनजागृती अशा हजारो पर्यायानंतर अखेर हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. नगरसेवक मुकेश मोकाशी यांच्या सहकार्याने हा उपक्रम ठाण्याच्या खेवरा सर्कल भागात सुरू झाला आहे. मूर्तीची किंमत कमी केल्याने तरी भक्त शाडूच्याच मूर्तीकडे वळतील, या विचाराने अवघ्या एकशे एक रुपयांत गणरायाचे मनोहारी रूप गणेशभक्तांना खरेदी करता येणार आहे. यात सहा इंचापासून दोन फुटांपर्यंत विविध रूपांतील देखणे बाप्पा उपलब्ध आहेत. रत्नजडीत, विविधरंगी सुबक मूर्ती पेण येथील मूर्तिकारांनी साकारल्या असून, केवळ पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी त्या या उपक्रमांतर्गत विकल्या जाणार आहेत. मानपाडा येथील खेवरा सर्कल या ठिकाणी हा उपक्रम सुरू झाला आहे. गणेश चतुर्थीपर्यंत 24 तास हा उपक्रम सुरू राहणार आहे. मूर्तींसाठी 9833431148 आणि 9769672394 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 

रास्त दरात सुबक मूर्ती 
शाडूच्या आणि त्यातही वैविध्यपूर्ण मूर्तींची नोंदणी आता संपल्याने अनेकांना प्लास्टर ऑफ पॅरिसचा पर्याय स्वीकार करावा लागतो. तर काही दुकानांत शिल्लक मूर्ती चढ्या भावाने विकल्या जात आहेत. "एकशे एक रुपयांत इको फ्रेंडली बाप्पा' उपक्रमांतर्गत किंमत आणि पर्यावरणपूरक उत्सव हे दोन्ही उद्देश साध्य होत आहे. रास्त दरात लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, सावकार फेटा, मल्हार फेटा अशा सुबक मूर्ती विकत घेता येणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 thane ganesh ustav