यंदा ६५ टन निर्माल्य संकलित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

ठाणे - गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत यंदा ६५ टन निर्माल्य संकलित केल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली. यंदा अविघटनशील पदार्थांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी झाल्याने शुद्ध आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झाल्याची माहितीही संस्थेने दिली.

ठाणे शहराला जलप्रदूषणातून मुक्‍त करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव आणि निर्माल्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा उपक्रम समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. त्यानुसार ठाण्यातील मासुंदा, कळवा, विटावा, खारेगाव, रायलादेवी, वृंदावन, उपवन, रेवाळे, मीठबंदर, कोलशेत येथील तलाव, खाडी व कृत्रिम तलाव परिसरात पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा भाग म्हणून निर्माल्य संकलन करण्यात आले. यंदा प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण ६० टक्‍के, तर थर्माकोलचे प्रमाण १०० टक्‍के कमी झाल्याचे समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी सांगितले.

जलप्रदूषणाला आळा
प्‍लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर यंदा निर्माल्‍यात अविघटनशील पदार्थांचे प्रमाण अत्‍यल्‍प आढळले. सजावटीतही प्‍लास्‍टिकचा वापर कमी झाला आहे. सातत्‍यपूर्ण पाठपुरावा लोकजागरणामुळे ठाण्यातील तलाव व खाडी यांच्‍या जलप्रदूषणाला यामुळे आळा बसल्याचे भटू सावंत यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 This time 65 tons Nirmalya collected