Ganesh Festival 2018 : जाती-धर्माचा भेद सारत 'त्यांनी' केली बाप्पाची स्थापना

दिनेश गोगी
Tuesday, 18 September 2018

उल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या भाड्याच्या घरात पाच दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली होती. धर्माच्या भिंतींना छेद देण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या या दाम्पत्यावर शाबासकीची थाप पडू लागली आहे.

कॅम्प नंबर 5 मधील प्रेम नगर टेकडी परिसरात एका चाळीत शकील शेख त्याची पत्नी व मुलगा राहतो. शकील मोलमजुरी तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करून उदरनिर्वाह चालवतात. याघडीला धर्माच्या जातीच्या भीती दिसत आहेत. त्यामुळे माणुसकी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जास्त शिकलेला नसला तरी जात-धर्म यांच्या निर्माण झालेल्या भिंतींना छेद मिळावा या सकारात्मक उद्देशाने शकीलने त्याच्या पत्नीला विश्वासात घेऊन गणेशोत्सवात बाप्पाची स्थापना केली.

यंदाचे त्यांचे हे तिसरे वर्ष. पहिल्या दोन वर्षात चाळीतील नागरिक तेवढे दर्शन घेत होते. यावर्षी मात्र गणेशभक्तांनी शकिलच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊन शकील दाम्पत्यावर शाबासकीची थाप देताना भरभरून कौतुक केले. या बाप्पाची शेख कुटुंबीय दररोज विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा, आरती करतात.

आपण मुस्लिम असलो, तरी हिंदू आणि मुस्लिमांचे सगळे सण साजरे करतो. जितक्या उत्साहाने ईद साजरी करतो, तितक्याच भक्तिभावाने बाप्पाची पूजा करतो, असे जमील शेख सांगतात. मध्यमवर्गीय असलेल्या शेख यांच्या या कृतीचे उल्हासनगरमध्ये कौतुक होत असून, त्यांच्या घरी परिसरातले लोकही मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He established the Bappa with the difference of caste and religion